Eknath Shinde on Mahim Assembly Constituency Sada sarvankar vs Amit Thackeray : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत नाराजीनाट्य पाहायला मिळतंय. उमेदवारीवरून बंडखोरीही करण्यात आली आहे. तसंच, मनसेला पाठिंबा देण्याकरता अनेक जागांवर वादही झाली. माहीम विधानसभा मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार होती. परंतु, तेथील स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी मनसेला समर्थन देण्यास विरोध केल्याने येथेही आता बहुरंगी लढत होणार आहे. दरम्यान, या सर्व वादात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते ANI ने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

महाविकास आघाडी आणि महायुती यांचं जागावाटप निश्चित झालं आहे. यासह सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून ४ नोव्हेंबरला उमदेवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने हा मतदारसंघ हायवोल्टेज ठरतोय. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून सदा सरवणकर येथून उभे आहेत. त्यांनी उमेदवारी मागे घेऊन अमित ठाकरे यांना समर्थन द्यावं, असं महायुतीकडून सूचित करण्यात आलं होतं. परंतु, गेले १५ वर्षे आमदार राहिलेल्या सदा सरवणकर यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला. यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला. काहीही झालं तरी मी ही निवडणूक लढवणारच, असा चंग त्यांनी बांधलाय. या सर्वा पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मवाळ भूमिका घेतली आहे.

CM Eknath Shinde on Arvind Sawant Statement about Shaina NC
CM Eknath Shinde : अरविंद सावंत यांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकारणापायी…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Ladki Bahin Yojana December
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती!
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
uddhav thackeray sada sarvankar
Sada Sarvankar : “आपलं अंगण सोडून दुसऱ्याच्या…”, सदा सरवणकरांच्या ‘त्या’ पोस्टवरून ठाकरेंच्या शिवसेनेचा चिमटा
gross state income maharashtra
महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला

हेही वाचा >> Sada Sarvankar : “मी माघार घेण्याचा काही प्रश्नच नाही, माहीमधून लढणार आणि…”; सदा सरवणकर यांचं वक्तव्य

सदा सरवणकरांचे कार्यकर्ते आक्रमक, ते निवडणूक लढवण्यावर ठाम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “राज ठाकरे लोकसभेत आमच्याबरोबर होते. त्यांच्याबरोबर माझी चर्चाही झाली होती. त्यांची काय रणनीती आहे हे मी त्यांना विचारलं होतं. त्यावर ते म्हणाले होते की शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) होऊद्या. मग ठरवू. पण त्यांनी थेट उमेदवारच जाहीर केला. आता (माहीम विधानसभा मतदारसंघातून) आमचेही आमदार आहेत. ते आमचे जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशीही मी चर्चा केली. त्यांचे कार्यकर्ते फार आक्रमक असून ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं नाही पाहिजे, हेही नेत्याचं काम असतं. त्यामुळे आजच्या तारखेला आमची शिवेसना (एकनाथ शिंदे), भाजपा आणि एनसीपी (अजित पवार) यांची महायुती आहे. याच महायुतीत आम्ही निवडणूक लढवत आहोत. तसंच, आरपीआय, जनसुराज्य असे लहान पक्ष सोबतीला असून आम्ही बहुमत मिळवू”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे राज ठाकरे सध्या तरी महायुतीचा भाग नसल्याचं सिद्ध झालं असून ते विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना मदत करणार नसल्याचंही यामुळे स्पष्ट होतंय.