आज शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जात आहे. वर्धापन दिनी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली असून शिवसेनेसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला आहे. मुलगा श्रीकांत शिंदे याने आपल्याकडे एकच गोष्ट मागितली होती, तीही मी पूर्ण करू शकलो नाही, असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलं. यावेळी त्यांनी एक जुनी आठवण सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले, “मला आठवतंय श्रीकांत डॉक्टर झाला. एमबीबीएस झाला. सर्जन झाला. त्याने मला एकच गोष्ट मागितली. मला रुग्णालय बांधून द्या, असं तो म्हणाला. पण मी तुम्हाला सांगतो, त्याचा बाप त्याला रुग्णालय बांधून देऊ शकला नाही. रुग्णालय बांधायचा विचार करायचो, तेव्हा कुठली तरी निवडणूक यायची. मग रुग्णालयाचा विषय मागे पडायचा.”

हेही वाचा- “मोदींनी कोविड लस तयार केली मग संशोधक गवत…”, फडणवीसांचा ‘तो’ VIDEO दाखवत उद्धव ठाकरेंची तुफान टोलेबाजी!

“ह्या एकनाथ शिंदेंनी कर्ज काढून निवडणुका लढवल्या आहेत. निवडून आल्यानंतर आम्ही निवडलेली माणसं घेऊन मातोश्रीवर जायचो. त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल द्यायचो. हे माझ्या नेतेमंडळींनाही माहीत आहे. मी पक्षात मिळेल ते काम केलं. कष्ट केलं. वयाच्या २१ व्या वर्षी मी बेळगावच्या तुरुंगात ४० दिवस होतो. माझ्यावर कितीतरी केसेस झाल्या. अनेक वेळा तुरुंगवास झाला. पण तुम्ही (उद्धव ठाकरे) काय केलं? व्यासपीठावर बसलेल्या आमच्या नेत्यांनीही तेच भोगलंय म्हणून शिवसेना मोठी झाली,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.