Eknath Shinde On Uddhav Thackeray : नागपूरमधील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत या अधिवेशनात झालेल्या निर्णयाची माहिती दिली. तसेच विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली होती. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता खोचक टीका केली. “काहींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताना आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता ते आमदारकी वाचवण्यासाठी पर्यटक म्हणून विधानभवनात येऊन गेले”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“गेले आठ दिवस सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन आज संपलं. या अधिवेशनात चांगले निर्णय घेतले गेले आहेत. खरं तर आमचं सरकार नव्याने स्थापन झालं नाही तर आमची टीम तिच आहे फक्त मॅच नवीन आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचं कामकाज सुरु झालं आहे. अधिवेशनाचा वेळ कमी असला तरी सर्व कामकाज पूर्ण झालं. अधिवेशनात पुरवणी मागण्या देखील मान्य झाल्या. आमच्या सरकारने ज्या योजना सुरु केल्या त्या योजना सुरु ठेवण्यासाठी जी आर्थिक मदत लागते त्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. या सर्व योजना सुरु राहतील. त्या बंद होणार नाहीत”, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Rajul Patel join eknath Shinde Shiv Sena
Rajul Patel : ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा धक्का; ‘या’ महिला नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Praniti Shinde Criticized Devendra Fadnavis
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचा आरोप, “देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम, महाराष्ट्र दिवाळखोरीच्या…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंची खिल्ली, “रुसू बाई रुसू नाहीतर गावात बसू, अशी…”
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

हेही वाचा : “राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”

“विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांना आम्ही उत्तरं दिली. अधिवेशन काळात मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. विधानपरिषदेच्या सभापतींचीही निवड झाली. तसेच पुणे विमानतळाला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्तावही मंजूर झाला आणि आम्ही हा प्रस्ताव केंद्राला पाठवला. तसेच विरोधकांनी प्रश्न सभागृहात न मांडता फक्त माध्यमांसमोर आणि सभागृहाच्या पायऱ्यांवर मांडले. नव्या सरकारला आम्ही गती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. महायुती सरकारची जी गती होती, ही गती अधिक वेगवान झाली आहे”, असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

“कोणत्याही गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम आमचं सरकार करणार नाही. तसेच काही लोक म्हणाले की आमचे मंत्री प्रश्नांची उत्तरं देत नाहीत. तसेच काहीजण आले आणि अधिवेशन विनोदी असल्याची टीका करून गेले. मात्र, काहींनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, तेव्हा आमदारकीचा राजीनामा देऊ असंही म्हटलं होतं. पण ती आमदारकी वाचवण्यासाठी आता फक्त पर्यटक म्हणून इकडे अधिवेशनात येऊन गेले. खरं तर अधिवेशनाला विनोदी म्हणणं म्हणजे हाच मोठा विनोद आहे”, असं म्हणत नाव न घेता उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Story img Loader