नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामध्ये “काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके!’ या शब्दांमुळे प्रकाशझोतात आलेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांनी आपण आपल्या इच्छेने एकनाथ शिंदेंसोबत आलो असल्याचं म्हटलंय. शहाजीबापू यांनी जारी केलेल्या एका व्हिडीओमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या नावाने जनतेनं आपल्याला मतं दिल्याचंही म्हटलंय. इतकच नाही तर आमच्यावर बळजबरी करण्यात आलेली नाही, उलट आम्हीच शिंदे यांना इथं आणून आमचं राजकारण वाचवा असं सांगितल्याच्या भावना शहाजीबापू यांनी व्यक्त केल्या.
नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: मुंबईला कधी परत येणार? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “मुंबईला आम्ही…”
“जय महाराष्ट्र! मी शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील. मी शिंदेसाहेबांसोबत आहे. ही आमची राजकीय चळवळ आणि लढाई आहे. आमचे गटनेते एकनाथ शिंदेंवर विश्वास ठेऊन आम्ही ही लढाई लढतोय. आम्हाला कोणीही या ठिकाणी बळजबरीने घेऊन आलेलं नाही. आम्हाला कोंडलं नाही, मारलं नाही. अफवा पसरवू नका,” असं म्हणत शहाजीबापू यांनी एक व्हिडीओ जारी केलाय.
नक्की वाचा >> “शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी, ते हिंदूत्वही मानत नाहीत कारण, कारण तसं असतं तर…”
“आम्ही इथं आलोय ते उलटपक्षी असं म्हटलं पाहिजे की, ४० आमदार एकजुटीने विचार करुन शिंदे यांना इकडे घेऊन आले. आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या मतदारसंघातील जनता आणि आमचं मतदारसंघातील भविष्यामधील राजकारण वाचवा. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आमचं राजकारण उद्धवस्त होत आहे,” असंही शहाजीबापू म्हणालेत.
नक्की वाचा >> महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचा मोठा निर्णय; आता…
“आम्ही जनतेच्या समोर जाताना, मतं मागत असताना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना मत द्या, असं म्हटलं. देवेंद्र फडणवीसांचं आम्ही नाव घेतलं. उद्धव ठाकरेंचं नाव घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो. मतं मागितली. लोकांनी आम्हाला लोकांनी भरभरुन मतं दिली,” असंही त्यांनी या व्हिडीओत म्हटलंय.
नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: “गुवाहाटीला जाऊन मला…”; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल बोलताना शरद पवारांचं वक्तव्य
पाहा आमदार शहाजीबापू पाटील यांचा व्हिडीओ –
नक्की वाचा >> विश्लेषण : बहुमत म्हणजे काय? ते कसं, कोणाला आणि कधी सिद्ध करावं लागतं?; महाराष्ट्रातील बहुमताचे निकष काय?
“२००९ साली शिवसेनला साकोल्यामध्ये १६०० मतं होती. मी २०१३ साली पक्षात प्रवेश केला. २०१४ साली शिवसेनेला ७६ हजार मतं मिळाली. २०१९ ला एक लाख मतं मिळवून गणपतराव देखमुखांसारख्या मोठ्या माणसाच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा झेंडा रोवला. पण पुढील अडीच वर्षामध्ये अहंकाराने आणि गर्वाने राष्ट्रवादीचा प्रत्येक मंत्री वागला,” असा आरोप शहाजीबापू यांनी केलाय.