अलिबाग- शिवसेनेचा सामान्य कर्यकर्ता मुख्यमंत्री झाला म्हणून काहींना पोटदुखी होते आहेत. मी मख्यमंत्री झालो तरी मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार असे ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते कर्जत येथे २७४ कोटींच्या कामांचे लोकार्पण सोहळ्यनंतर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. राजकीय वारसा, राजकीय पार्श्वभुमी, सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यानींच मुख्यमंत्री व्हावे असा लिखीत करार आहे असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.  शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या कष्टातून मोठी झाली. त्यासाठी हजारो शिवसैनिकांनी साथ दिली. पण जेव्हा शिवसेना  अडचणीत आणण्याचे काम काही जणांनी सूरू केले तेव्हा आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला.

जेव्हा अन्याय होतो. पक्षाचा संघटनेचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा शिवसैनिक गप्प बसू शकत नाही. शिवसेना वाचली पाहीजे, धनुष्यबाण वाचला पाहीजे, शिवसैनिकाचे खच्चीकरण थांबले पाहीजे म्हणून हा निर्णय घेतला. आज खरी शिवसेना आपल्या सोबत आहे. बाळासाहेबांचे विचार आणि अनंत दिघे यांचे आशिर्वाद आमच्या सोबत आहेत. पुर्वी आमदारांना ३ कोटी निधी मिळत होता आज ८०० कोटी निधी मिळतोय दोन सरकारमधील हा फरक आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दिड वर्षात अडीचशे कोटी रूपये दिले. त्यापुर्वीच्या अडीच वर्षात अडीच कोटी रुपये दिले. हे पैसे जनतेचे आहेत. त्यांच्या आजारपणासाठी नाही दिले तर कधी देणार. एखाद्याचा जीव त्याच्यामुळे वाचतो.

Guardian Minister Controversy
Manikrao Kokate : पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, “आता निर्णय…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Ajit Pawar
Ajit Pawar : “तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात…”, अजित पवार भर सभेत संतापले, नेमकं काय घडलं?

हेही वाचा >>>“एका विशिष्ट परिस्थितीत आम्ही वेगळा निर्णय घेतला अन् ती…”, छगन भुजबळांचा शरद पवारांवर हल्लाबोल

महात्मा जोतीराव फुले आरोग्य योजनेतून राज्यातील साडेबारा कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत लाभ दिला. सर्व अटी काढून टाकल्या, शेतकरी सन्मान योजनेत केंद्र सरकार सोबत शेतकऱ्यांना आणखिन सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याला १२ हजार रुपये मिळू लागले. एक रुपयात पिक विम्याचे संरक्षण दिले. सिंचनाचे ३५ प्रकल्प मार्गी लावले. १० लाख हेक्टर जमिन ओलिताखाली येणार आहे. महिलांना आणि जेष्ट नागरीकांना एसटीत ५० टक्के सवलत दिली. महिला सक्षमीकरणासाठी धोरण आणले.

आधीच्या सरकारने विकास विरोधी भुमिका घेतल्या होत्या. त्यामुळे परदेशी गुंतवणूक घटली होती. आपले सरकार आल्यानंतर विकास प्रकल्प मार्गी लावले, परदेशी गुंतवणूक वाढली. अनेक पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावले. केंद्रात कुठलाही प्रस्ताव पाठवला तरी तो मंजूर होतो. ज्यांनी आम्हाला निवडून दिले. त्यांना निधी मिळायला हवा, तो मिळत नव्हता. त्यामुळे निर्णय घ्यावा लागतो. मी गावी जातो शेती करतो. हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतो टिका केली गेली. पण हेलिकॉप्टरने जाऊन फोटो काढण्यापेक्षा, हेलिकॉप्टरने जाऊन शेती करणे कधीही चांगले. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी लगावला.

हेही वाचा >>>वरिष्ठांनी समज द्यावी अन्यथा आरेला कारेची भूमिका घ्यावी लागेल – मंत्री शंभूराज देसाई

डीप क्लिन ड्राईव्ह सुरू केले. लोक त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. तर काहींची पोटदुखी सुरू झाली. शहरांची सफाई हे आयुक्तांचे काम असल्याचे बोलू लागले. पण मी सिएम म्हणजे क़ॉमन मॅन आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. तुमच्यातला कार्यकर्ता मुख्यमंत्री झाला हे त्यांना सहन होत नाही. काही जण शासन आपल्या दारी योजनेला मिळणाता अभुतपुर्व प्रतिसाद बघून काही जण या योजनेचे ऑडीट करा मागणी करत आहेत. पण निवडणूका आल्यावर जनता त्यांचे ऑडीट करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी म्हटले.

पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने…

भारताला जगभरात नाव लौकीक मिळवून देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले. देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य दिले. ३७० कलमही हटवले. काही जण  मंदीर वही बनाएंगे आणि तारीख नही बताएंगे अशी टीका करत होते. पण पंतप्रधान मोदी यांनी मंदीरही बांधले आणि मंदीर कधी पुर्ण होणार याची तारीखही सांगितली, आज संपुर्ण देशात जय श्रीरामचा माहोल आहे. काही जण कॅलेंडर मध्ये तारखा शोधत बसले असल्याची टिका एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. त्यामुळे अबकी बार ४५ पार हा आमचा नारा आहे. त्यासाठी आपली साथ कायम ठेवा असे आवाहन त्यांनी केले.

कर्जत मध्ये १०० बेडचे हॉस्पीटल व्हावे, ते मंजूरी दिली जाईल, बाबासाहेब आंबेडकर  पेण अर्बन बँकेचा प्रश्न सोडवला जाईल, कर्जत नळपाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली जाईल, पैसे देतांना सरकार हात अखडता घेणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या जाहीर सभेला खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले, सदा सरवणकर उपस्थित होते.

Story img Loader