केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हाबाबत मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्तांतराबद्दल मोठं विधान केलं. महाराष्ट्रात सत्तांतर घडवण्यासाठी सुमारे २ हजार कोटी रुपये खर्च केले, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय खरंच पैशे देऊन फिरवला का? किंवा सत्तांतर घडवण्यासाठी खरंच २ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले का? असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.
हेही वाचा- ‘२०२४ मध्येही तुम्हीच मुख्यमंत्री असणार का?”; एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
या प्रश्नावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. ४० ते ५० आमदार, १३ खासदार आणि हजारो नगरसेवक पैसे देऊन खरेदी करता येतात का? असा उलट सवाल एकनाथ शिंदे यांनी विचारला. ते ‘एबीपी’ वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
हेही वाचा- “खोक्यांचे व्यवहार करतानाचे उद्धव ठाकरेंचे कॅसेट…”, नारायण राणेंचा गंभीर आरोप
सत्तांतर घडवण्यासाठी खरंच २००० कोटी रुपये खर्च करण्यात आले का? असं विचारलं असता एकनाथ शिंदे म्हणाले की, ग्रामपंचायमधील एखादा सदस्य पार्टी सोडण्यापूर्वी दहा वेळा विचार करतो. पण इथे ४० ते ५० आमदार, १३ खासदार आणि हजारो नगरसेवक आमच्याबरोबर आले आहेत. एवढे लोक पैसे देऊन खरेदी करता येतात का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी विचारला.
हेही वाचा- “रवींद्र धंगेकरांची उमेदवारी रद्द करा”; भाजपाची निवडणूक आयोगाकडे मागणी, नेमकं कारण काय?
“त्यांच्याकडे (ठाकरे गट) बोलण्यासाठी आता काहीच उरलं नाही. त्यांच्याकडे केवळ दोन-तीन शब्दच आहेत. त्यामुळे मी आरोपांचं उत्तर आरोपाने देणार नाही. आरोपांचं उत्तर कामाने देईन. या राज्याचा विकास करून मी त्यांना उत्तर देईन…”, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.