अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केली असून आता राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावरही दावा केला आहे. अजित पवारांनी आज राजभवनात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा दावा केला. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री झाल्याने महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे.

हेही वाचा >> अजित पवारांच्या शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“प्रशासनाचा चांगला अनुभव असणारे, विकासावर विश्वास ठेवणारे अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. परंतु, अडीच वर्षांत आलेला अनुभव आणि आम्ही वर्षभरात केलेला विकास पाहिल्यानंतर त्यांनी विकासाला साथ दिली आहे. एखाद्या कार्यकर्त्याची गळचेपी होते, जेव्हा एखाद्या चांगल्या नेत्याला दुय्यम स्थान दिलं जातं, तेव्हा अशाप्रकारच्या घटना घडतात. त्यामुळे मी त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांच्या पाठीशी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी आहेत. हे राज्य खरंतर डबल इंजिनचं सरकार आहे. मोदींच्या नेतृत्त्वाखाली काम करणारं सरकार आता आणखी वेगाने बुलेट ट्रेनच्या गतीने धावणार आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
rohit pawar on ajit pawar confession
Rohit Pawar : “ज्या पक्षाने कुटुंब फोडलं, त्यांना…”; अजित पवारांच्या ‘त्या’ कबुलीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
Ajit pawar and jitendra awhad
Jitendra Awhad : “एवढाच पश्चाताप होतोय तर…”, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांचं आव्हान, म्हणाले…
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
amol mitkari on tanaji sawant
Amol Mitkari : अजित पवार गटाबाबत केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींचा मंत्री तानाजी सावंतांना टोला; म्हणाले, “जे खेकड्यामुळे धरण फुटले म्हणू शकतात, ते…”
kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

अजित पवारांनी भाजपा आणि शिंदे गटाला साथ दिल्याने महाविकास आघाडी फुटली असं वाटतं का असा प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, “महाविकास आघाडी अजून फुटायची राहिली आहे का? त्यांची बोट फुटली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात मोट बांधायचा प्रयत्न करणाऱ्यांची बोट आता फुटली आहे. त्यामुळे अजित पवार महाविकास आघाडीच्या फुटलेल्या बोटीतून विकासाच्या बोटीत आलेत”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.