Eknath Shinde Reaction on Parambir Singh allegations : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव होता, असा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. त्यांच्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनीही हा दावा खरा असल्याचं म्हटलंय. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “ही वस्तुस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते. गिरीश महारजन विरोधी पक्षात होते. विरोधी पक्षाला अडचणीत, गोत्यात आणणं, खोट्या केसेस दाखल करणं हे मी एकवेळ समजू शकतो. पण मी तर त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी होतो. पण माझ्याही बाबतीत असा प्रयत्न केला गेला. याबाबत मी योग्येवेळी सांगेन. प्रकरणात अडकवण्याचा आणि खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. मी यावर सविस्तर बोलणार आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Eknath Shinde
Eknath Shinde : “…पण ते पुन्हा आले”, देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत एकनाथ शिंदेंनी केलं राहुल नार्वेकरांचं अभिनंदन!

“महायुतीचं सरकार स्थापन झालं, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत हे त्यांना पचत नाही. ते सांगत होते की सरकार पडेल, पण सरकार मजबुतीने उभं आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणणारे योजनेचे फॉर्म कसे भरतात? हे दुट्टपी आहेत. यांना काही देणं घेणं नाही. यांना फक्त घेणं माहितीय, देणं माहीत नाही”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> “मविआच्या काळात फडणवीसांनाच नाही, तर एकनाथ शिंदेंनाही अटक करण्याचा प्रयत्न झाला”, परमबीर सिंह यांचा मोठा दावा!

“मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यााठी सर्व पक्षीय बैठक आम्ही बोलावली होती. पण कोणीही आले नाही. दुर्दैवाने राज्यात दोन समाजांमध्ये जे सुरू आहे ते थांबले पाहिजे अशी माझी प्रामाणिक भूमिका आहे. याबाबत शरद पवार मला भेटले तेव्हा मी त्यांना सांगितलं की राज्यात यापूर्वी कधीही असं पाहायला मिळालं नव्हते. महाराष्ट्राची जी काही परंपरा आहे त्याला बाधा येता कामा नये. माझी चर्चा झाली आहे जे काही करावं लागेल ते आम्ही करू”, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

नेमकं काय म्हणाले परमबीर सिंह?

महाविकास आघाडी सरकारने माझ्याविरोधात खोट्या केसेस दाखल करून मला अटक करण्याचा प्रयत्न केला. इतकच त्यांनी तर त्यांनी ठाण्यातील एका जुन्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात तत्कालिन विरोधी पक्षनेते आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अटक करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाची चौकशी तेव्हाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांनी केली होती. त्यांना थेट संजय पांडे यांच्याकडून निर्देश मिळत होते. तर संजय पांडे यांना अनिल देशमुख, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून निर्देश दिले जात होते. त्याप्रकरणात केवळ मलाच नाही तर देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला”, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय आश्चर्याची बाब म्हणजे याच प्रकरणात तत्कालिन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही अडकवण्याचा प्रयत्न झाला. त्यांना अटक करण्यासाठी संजय पांडे यांनी सरदार पाटील यांना निर्देश दिले होते. याचाच अर्थ तेव्हाच्या मुख़्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता”, असा दावाप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला.

Story img Loader