माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जळगावमधील पाचोरा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ते (नरेंद्र मोदी) म्हणतात ना, मी फकीर आहे, मग झोळी लटकवून निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातात भिकेचा कटोरा देऊन जाशील त्याचं काय करायचं? पंतप्रधानांवरील या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. शिंदे म्हणाले की, ते वक्तव्य दुर्दैवी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचं नेतृत्व संपूर्ण जगात सिद्ध केलं आहे. आपली अर्थव्यवस्था मोठ्या उंचीवर नेली आहे. त्यामुळेच आपल्याला जी २० परिषदेचं अध्यक्षपद मिळालं. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. पंतप्रधानांच्या मातोश्रींचं निधन झालं तेव्हादेखील त्यांनी देशाला प्राधान्य दिलं. त्यांनी त्यांची राष्ट्रभक्ती सिद्ध केली आहे.

हे ही वाचा >> “आता स्फोट होऊ शकतो”, उद्धव ठाकरेंच्या नरेंद्र मोदींवरील ‘त्या’ टीकेनंतर भाजपा संतप्त, बावनकुळे म्हणाले, “असंतोष भडकणार”

एकनाथ शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य हे वैयक्तिक द्वेशातून आलं आहे. लोकप्रियतेची पोटदुखी निर्माण झाल्यावर अशा प्रकराचं वक्तव्य करण्याचं पाप काही लोक करतात. २५ वर्ष त्यांनी युतीत काम केलं. आता त्याच भाजपा नेत्याबाबत असं वक्तव्य हे निंदाजनक आहे. त्यांचं वक्तव्य ही बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती होऊ शकत नाही. सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्रीपदासाठी ते काय करू शकतात हे आधीच त्यांनी दाखवलं आहे. त्याचीच पुनरावृत्ती ते करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde reply on uddhav thackeray statement on pm narendra modi asc
Show comments