मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे शिवसेना पक्षवर्चस्वावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरु असताना दुसरीकडे शिंदेंनी या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. सुरुवातीला त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचीही सदिच्छा भेट घेतली. मनोहर जोशी यांना भेटून आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या या भेटसत्राचे नेमके सांगितले आहे. या भेटींमागे कोणताही राजकीय होतू नाही. ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद मिळावेत याच उद्देशाने मी मनोहर जेशी यांची भेट घेतली, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> “राऊतांच्या म्हणण्यात तथ्य, सत्ताबदल होणार पण…” सुधीर मुनगंटीवार यांचे महत्त्वाचे विधान

“राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप चांगले काम केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे त्यांच्या सदिच्छा भेटीसाठी मी आलो आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले आहे. शिवसेना वाढवण्याचे त्यांनी काम केलेले होते. अशा ज्येष्ठ नेत्याचे आशीर्वाद, शुभेच्छा, मार्गदर्शन नेहमीच कामी येणार आहे,” असे एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> आणखी वाचा – माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हिंदुजा रुग्णालयात दाखल, उद्धव ठाकरेंकडून प्रकृतीची विचारपूस

“मनोहर जोशी यांनी त्यांच्या कार्यकाळात बाळासाहेब ठाकरेंसोबत चर्चा करुन ६० योजनांची घोषणा केली होती. या योजनांचे पुस्तकदेखील त्यांनी मला भेट दिले आहे. या योजना तुम्ही प्रभावीपणे राबवा असे त्यांनी मला सांगितले. बाळासाहेबांना अपेक्षित असलेल्या या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, अशी भावाना त्यांनी व्यक्त केली,” असेही शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा >> “त्यांच्यावर बोलणे म्हणजे आपल्याच तोंडाची वाफ गमावणे” राऊतांच्या सत्तांतराच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीसांची टीका

“थोरामोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला हवे असतात. आम्हाला आमच्या सरकारच्या माध्यमतून चांगले काम करायचे आहे. आम्हाला राज्याचा सर्वांगीन विकास करायचा आहे. लोकांच्या हिताच्या असणाऱ्या योजना पूर्ण करायच्या आहेत. योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी आम्हाला काम करायचे आहे. या भेटींमागे कोणताही राजकीय हेतू नाही. आम्ही त्यांच्या हाताखाली काम केलेले आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत,” असे सांगत एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde said meets manohar joshi and liladhar dhake just for having blessing prd