Eknath Shinde : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यानंतर बहुचर्चित असा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. एकूण ३९ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर आनंदाचं वातावरण आहे. तरीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक महत्त्वाचा फॉर्म्युला सांगितला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी हा महत्त्वाचा फॉर्म्युला विशद केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“आम्ही पक्षात ठरवले आहे की अडीच वर्षांचं मंत्रिपद असेल. त्यामुळे अनेक लोकांना संधी देऊ शकतो. जो काम करेल त्याला संधी मिळेल. जो विभाग ज्याला मिळेल तिथे त्याने पूर्ण काम करून दाखवले पाहिजे. जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल”, असं एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी सांगितले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पत्रकारांनी भाजपाचा देखील अडीच वर्षांचं मंत्रिपद असेल, असा फॉर्म्युला ठरला आहे का?, असा सवाल केला. यावर आम्ही प्रत्येक मंत्र्यांच्या कामाचं परफॉर्मन्स ऑडिट करू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

अनेक नेते असे आहेत ज्यांच्यात मंत्री होण्याची क्षमता

एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले, “अनेक नेते असे आहेत, त्यांच्यात मंत्री होण्याची क्षमता आहे. आम्ही अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरवल्याने अनेक चेहऱ्यांना संधी मिळेल. मात्र त्यातही परफॉर्मन्स दाखवावा लागेल.” परफॉर्म ऑर पेरिश असाच फॉर्म्युला एक प्रकारे एकनाथ शिंदे यांनी सांगितला आहे. तसंच आता आमच्यापुढे मिशन समृद्ध महाराष्ट्र हेच मिशन आहे. महाविकास आघाडीच्या काळात जे बंद पडलेले प्रकल्प होते त्यांना आम्ही मागच्या अडीच वर्षांत चालना दिली. आताही आम्ही महाराष्ट्र समृद्ध कसा होईल याकडे आमचं संपूर्ण लक्ष असणार आहे, असंही एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) म्हटलं आहे.

हे पण वाचा- कसं आहे फडणवीसांचं मंत्रिमंडळ? २० नवे चेहरे, चार महिला व सहा राज्यमंत्री, १४ जिल्ह्यांची पाटी कोरीच; जाणून घ्या २० महत्त्वाचे मुद्दे

देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं आहे?

भाजपातही असाच फॉर्म्युला असेल असेल का? हे विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले आम्ही परफॉर्मन्स ऑडिट करु. ऑडिटमध्ये लक्षात आले की मंत्री योग्य काम करत नाही आहे, तेव्हा त्या मंत्र्यांचा पुनर्विचार केला जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही तिघांनी आपल्या मंत्र्यांना सांगितले आहे की परफॉर्मन्स ऑडिट केलं जाईल. ज्यांना मंत्री म्हणून घेतले नाही, त्यांना पक्षाकडून वेगळी जबाबदारी दिली जाईल. भाजपमध्ये ज्यांना मंत्री केलं जात नाही, तेव्हा त्यांना पक्षाकडून काही वेगळी जबाबदारी देण्याचे निर्णय झालेले असतात.. मात्र जे मंत्री आज ड्रॉप झाले आहे त्याच्यामध्ये काही लोक परफॉर्मन्स न केल्यामुळे ड्रॉप झाले असतील असेही होऊ शकतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.