महाराष्ट्र सरकारने २०१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्रातील विविध भागाच्या पर्यटन विकासासाठी १ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करणार असल्याची घोषणा केली होती. यांतर्गत सिंधुदुर्गात देशातील पहिली पाणबुडी उपलब्ध करून देण्यात येणार होती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्रविश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राज्य सरकार राबवणार होतं. परंतु, हा प्रकल्प आता गुजरातच्या द्वारका येथे होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. हा प्रकल्प गुजरातला नेण्यासाठी गुजरात सरकारने माझगाव डॉक लिमिटेडशी करार केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प गुजरातला गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोणीही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. माझ्याबरोबर इथे दीपक केसरकर आहेत. मी सकाळी मंत्री उदय सामंत यांच्याशीदेखील चर्चा केली आहे. हा प्रकल्प आपल्या राज्याचा आहे, जो आपल्या राज्यातून बाहेर जाणार नाही, याची तुम्ही खात्री बाळगा. यासह आपल्या राज्यात इतरही मोठे प्रकल्प सुरू होत आहेत. एमटीएचएल प्रकल्पाचं येत्या १२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या २२ किलोमीटर लांबीच्या सिंगल लाँगेस्ट ब्रीजचं (सर्वात लांब पूल) उद्घाटन होणार आहे. त्यामुळे २ तासांचं अंतर १५ मिनिटांवर येणार आहे. यासह वेळेची आणि इंधनाची बचत होईल. प्रदूषणही कमी होईल. हा एक गेमचेंजर प्रकल्प असेल. या प्रकल्पामुळे नवी मुंबईजवळ महामुंबई तयार होईल. तिकडे मोठ्या प्रमाणावर विकास होईल. आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा

दरम्यान, महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला जाणार असल्याच्या चर्चांबाबत विचारल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर याचं खापर फोडलं आहे. दीपक केसरकर म्हणाले, “मी २०१८ रोजी अर्थ राज्यमंत्री असताना हा प्रकल्प महाराष्ट्रात आणला होता. दुर्दैवाने २०१९ मध्ये महाराष्ट्राला असे पर्यटन मंत्री मिळाले, ज्यांना पर्यटन म्हणजे काय हे माहीत नव्हतं. त्यांच्या काळात हा प्रकल्प रखडला. अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणायचे, ‘पाणबुडी प्रकल्प आहे, ती पाण्यात बुडाली तर काय?’, अशी त्यांच्या मनात शंका होती. मुळात पाणबुडी पाण्यात बुडण्यासाठी म्हणजे खोलवर जाण्यासाठी असते, हे त्यांना माहीत नसावे”

हे ही वाचा >> “पाणबुडी बुडेल म्हणून…”, माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर केसरकरांची टीका; म्हणाले, प्रकल्प महाराष्ट्रातच

केसरकर म्हणाले, “सिंधुदुर्गात असलेले समुद्री विश्व किंवा ज्याला प्रवाळ म्हणतात. हे इतर कुठेही इतकं चांगलं नाही. त्यामुळे पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्गातच होईल. आपला प्रकल्प पाहून केरळ आणि गुजरातने अशाच पाणबुडी बूक केल्या आहेत. प्रत्येक राज्याला आपल्या राज्यात काही ना काही उपक्रम राबवायचे असतात, याचा अर्थ प्रकल्प हातातून गेला, असं होत नाही.

हे ही वाचा >> “प्रयोगशाळांमध्ये डीएनए चाचण्यांसाठी किट्स नाहीत, हायप्रोफाईल आरोपींच्या मदतीसाठी…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप

व्हायब्रंट गुजरात कार्यक्रमात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

एका बाजूला हा प्रकल्प महाराष्ट्रातच राहील असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असले तरी दुसऱ्या बाजूला हा प्रकल्प द्वारकेला (गुजरात) जाणार असल्याच्या चर्चा वाढू लागल्या आहेत. द्वारकेला हिंदू पौराणिक कथांमध्ये खूप महत्त्व आहे. कारण ते भगवान श्रीकृष्णाने निर्माण केल्याचा उल्लेख पुराणांमध्ये आहे. त्यामुळे पाणबुडी प्रकल्प द्वारकेला नेण्याची योजना असल्याचं बोललं जात आहे. १० जानेवारी २०२४ पासून गुजरातची राजधानी गांधीनगर येथे होणाऱ्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये पाणबुडी पर्यटन प्रकल्पाबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.