गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटात तणाव असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघावरून दोन्ही पक्षांमधील नेते भिडले. त्यापाठोपाठ राज्यातल्या सर्व प्रमुख वर्तमान पत्रांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली. तसेच या जाहिरातीत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. या जाहिरातीनंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या शिंदे गटाने आणखी एक जाहिरात प्रसिद्ध केली. ज्या ज्या कारणांमुळे पहिल्या जाहिरातीवर टीका झाली होती, त्या सर्व चुका दुसऱ्या जाहिरातीत दुरुस्त करण्यात आल्या. तसेच पहिली जाहिरात ही शिंदे गटाने किंवा शिंदे गटातील कोणत्याही नेत्याने दिली नव्हती असा दावा करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ती जाहिरात कुठल्या तरी हिंतचिंतकाने दिली असावी. परंतु त्या हितचिंतकाचं नाव अद्याप कोणीही सांगितलेलं नाही. दरम्यान, या जाहिरातीमुळे भाजपा-शिवसेनेत तणाव निर्माण झाला आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, एखाद्या अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे ही युती तुटायची नाही. ही युती इतकी कमजोर नाही. वैचारिक भावनेतून ही युती आम्ही केली आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हापासूनची ही युती आहे. उलट मधल्या एक वर्षभरात यात जो काही मिठाचा खडा कोणीतरी टाकला होता, तो आम्ही काढून फेकून दिला आहे.

Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
dhananjay munde valmik karad santosh deshmukh murder
Dhananjay Munde: “हे असले बॉस?” धनंजय मुंडेंचं हातात पिस्तुल घेतलेलं रील शेअर करत अंजली दमानियांची पोस्ट; ‘त्या’ व्हिडीओचाही समावेश!
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Shinde Fadnavis move by transferring Gadchiroli District Collector Gadchiroli news
गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करून शिंदेना फडणवीसांचा शह?
Image of a news headline
कोण आहे पाकिस्तानातून भारतात हल्ले घडवणारा रणजीत सिंह नीता? ट्रक ड्रायव्हरने कशी केली खलिस्तान झिंदाबाद फोर्सची स्थापना?

यावर माध्यमांच्या प्रतिनिधिंनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की, त्या अतिउत्साही कार्यकर्त्याचं नाव काय? तुम्ही त्याचं नाव का सांगत नाही? यावर मुख्यमंत्र्यांनी केवळ स्मितहास्य केलं. त्यामुळे त्यांना विचारण्यात आलं की, ती जाहिरात विरोधकांनी दिली होती का? त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा स्मितहास्य केलं आणि ते म्हणाले, असू शकतं. परंतु त्या जाहिरातीमुळे आमच्यात वितुष्ट येणार नाही. आमची दोस्ती जोरदार आहे. ‘ये फेविकॉल का जोड है, टुटेगा नही’, हे मी तुम्हाला कालच सांगितलं आहे.

हे ही वाचा >> “उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं खुली?”, उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “त्यांच्याशी चर्चा…

एकनाथ शिंदे म्हणाले, आमची ही युती सत्तेसाठी, खुर्चीसाठी किंवा कुठल्या पदासाठी झालेली नाही. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत, रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. लोकांमधले कार्यकर्ते आहोत. कुठला मुख्यमंत्री तुम्ही मुंबईच्या रस्त्यांवरून फिरलेला पाहिला आहे, नालेसफाईची पाहणी करणारा मुख्यमंत्री पाहिलाय का? समृद्धी महामार्गावर गेलेला, पुण्याला गेलेला मुख्यमंत्री पाहिला आहे का, परंतु तुम्ही (माध्यमं) त्या बातम्या छापत नाहीत, तुम्ही दुजाभाव करता.

Story img Loader