गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या शिंदे गटात तणाव असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघावरून दोन्ही पक्षांमधील नेते भिडले. त्यापाठोपाठ राज्यातल्या सर्व प्रमुख वर्तमान पत्रांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याची जाहिरात प्रसिद्ध झाली. तसेच या जाहिरातीत केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. या जाहिरातीनंतर दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या शिंदे गटाने आणखी एक जाहिरात प्रसिद्ध केली. ज्या ज्या कारणांमुळे पहिल्या जाहिरातीवर टीका झाली होती, त्या सर्व चुका दुसऱ्या जाहिरातीत दुरुस्त करण्यात आल्या. तसेच पहिली जाहिरात ही शिंदे गटाने किंवा शिंदे गटातील कोणत्याही नेत्याने दिली नव्हती असा दावा करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा