मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर पाहायला मिळाले. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली. “आम्ही दोघं (शिंदे-फडणवीस) सोबत आहोत, त्यामुळे थोडी थोडी बँटिंग आम्हालाही येते. संधी मिळाली की बॅटिंग करत असतो. नुकतीच तीन महिन्यांपूर्वी आम्ही बॅटिंग केली. सर्वांच्याच आशीर्वादाने ही मॅच आम्ही जिंकली” अशी टोलेबाजी यावेळी शिंदे यांनी केली.
“खोका खोका करणाऱ्यांना निवडणुकीत मोठा…”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाले…
“पवार साहेबांचं आजोळ आणि माझा जन्म साताऱ्याचा. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं ते करावं लागेल. त्यातच नागपूर कनेक्शनदेखील आहे” अशी मिश्किल टिप्पणीदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. हे राजकारणाचं व्यासपीठ नाही. खेळामध्ये राजकारण आणायचं नाही, असे शिंदे यावेळी म्हणाले. बीकेसीच्या दसरा मेळाव्याचा उल्लेख करत ‘आपल्या मनासारखं सर्व झालं” असं शरद पवारांना पाहून यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हेदेखील मंचावर उपस्थित होते. गुरुवारी निवडणुकीपूर्वी पवार, शेलार पॅनलच्या प्रचारसभेसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती. अमोल काळे विरुद्ध संदीप काळे असा सामना एमसीए निवडणुकीत रंगला आहे.