लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या निवडणुकीची तयारी म्हणून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते आपल्या सोईनुसार पक्षांतर करत आहेत. तर सत्ताधारी आणि विरोधकांकडून समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न केला जातोय. असे असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचाही भाजपा-शिवसेना (शिंदे गट) या महायुतीत समावेश करावा, असे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे म्हणाले आहेत. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

संदीप देशपांडे राहुल शेवाळेंच्या घरी

माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर महायुतीत मनसेचा समावेश करायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असे राहुल शेवाळे म्हणाले.

Uddhav Thackeray On Gautam Adani
Uddhav Thackeray : “…तर मोठा स्फोट झाला असता”, गौतम अदाणी प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
Eknath Shinde Guwahati tour
Sanjay Shirsat on Guwahati: “यावेळी उटी, गुवाहाटी जाणार…
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results in Marathi
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results : ‘या’ ३५ बंडखोरांनी महायुती-मविआची चिंता वाढवली, निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार?
Bala Nandgaokar meet Devendra Fadnavis
Bala Nandgaokar : बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; म्हणाले, “त्यांनी मला पाठिंबा…”
Chhagan Bhujbal on Eknath Shinde and Sharad Pawar
एकनाथ शिंदे खरंच शरद पवारांबरोबर जाणार? शिंदे गटाच्या नेत्याच्या दाव्यावर छगन भुजबळांचा टोला
no alt text set
Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार? पुण्यात लागलेल्या पोस्टरमुळे महायुतीमधील चढाओढ चर्चेत
Shivsena Thackeray vs SHinde in 49 constituencies
‘हे’ ५१ मतदारसंघ ठरवणार खरी शिवसेना कोणाची, ठाकरे – शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच नाना पटोलेंच्या विधानाची मोठी चर्चा; म्हणाले, “मी आणि देवेंद्र फडणवीस…”
no alt text set
Sanjay Raut : हा संपूर्ण दलित समाजाचा अपमान; शिंदेंच्या सेनेचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

राहुल शेवाळे नेमकं काय म्हणाले?

“मनसेचा महायुतीत समावेश करावा, अशी सर्वांचीच भूमिका आहे. कारण आम्ही ज्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा संकल्प केलेला आहे, त्याच विचारांवर मनसेची कार्यप्रणाली आधारित आहे. अशा वेळी समान विचार असणारे पक्ष एकत्र आले तर त्याचा फायदा होईल. मनसे पक्ष सोबत आला तर स्वागत होईल. राज ठाकरे याबाबत लवकरच निर्णय घेतील,” अशी भूमिका शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांनी मांडली

राज ठाकरे-एकनाथ शिंदे-फडणवीस अनेकवेळा एकत्र

दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली मैत्री लपून राहिलेली नाही. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ही त्रयी अनेकवेळा एकत्र दिसलेली आहे. त्यामुळे आगामी काळात खरंच मनसेचा महायुतीत समावेश होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.