Eknath Shinde : मुंबईत महाविकास आघाडीने जोडे मारो आंदोलन करत सरकारविरोधात मोर्चा काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट या ठिकाणी असलेला पुतळा कोसळला. ज्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीला जनता जोडे मारणार आहे असं म्हणत उत्तर दिलं आहे. निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. महाविकास आघाडीला पराभव दिसू लागला आहे त्यामुळे हे आंदोलन केलं जातं आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) म्हटलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा स्वाभिमान… त्यांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरलं आहेत. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष केला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असं म्हणत शेकडो कार्यकर्ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने रवाना झाले. तसंच गद्दारांना माफी नाही, शिवद्रोहींना माफी नाही अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले सहभागी झाले आहेत. हुतात्मा स्मारकाला अभिवादन करुन हा मोर्चा काढण्यात आला. मात्र हा मोर्चा शिवरायांच्या प्रेमासाठी नाही तर राजकीय हेतूने प्रेरित आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीला उत्तर दिलं आहे.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Vishnu Bhangale suspended from the Thackeray group, is now Jalgaon district head of Shinde group
जळगावमध्ये ठाकरे गटातून निलंबित, विष्णू भंगाळे आता शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख
Sanjay Raut Answer to Eknath Shinde
Sanjay Raut : “बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे…”, संजय राऊत यांचं एकनाथ शिंदेंना उत्तर
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
Pratap Sarnaik Thackeray Group
Pratap Sarnaik : उद्धव ठाकरेंना मुंबईत धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ठाकरे गटाचे…”
What Eknath Shinde Said?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, “सरडाही रंग बदलतो, पण अशी नवी जात…”
eknath shinde shivsena
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात, “सर्व पक्षांनी एकच रस्ता धरलाय, तो म्हणजे धनुष्यबाणाची शिवसेना”

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“महाविकास आघाडीचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. ही अतिशय वाईट आणि दुःखद घटना आहे. आमच्यासाठी ही बाब संवेदनशील आहे. तमाम महाराष्ट्राचे शिवभक्त या घटनेने भावनिक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी राजकीय मुद्दा नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हा आमच्या अस्मितेचा विषय आहेत. मात्र घडलेल्या घटनेचं राजकारण करणं हे विरोधक करत आहेत. हे जास्त दुर्दैवी आहे.” असं एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले.

हे पण वाचा- ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीच्या निशाण्यावर आलेले वडपल्लीवार आहेत तरी कोण ?

महाविकास आघाडीला जनता जोड्याने मारणार आहे

“कर्नाटकात काँग्रेस सरकारने बुलडोझर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडण्यात आला. आता तेच काँग्रेसवाले आंदोलन करत आहेत. या काँग्रेसवाल्यांनाच खरंतर जोड्याने किंवा चपलेने मारलं पाहिजे. ते सोडून आता मुंबईत आंदोलन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता समजदार आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता जोड्याने मारणार आहे.” असंही एकनाथ शिंदेंनी ( Eknath Shinde ) म्हटलं आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे लोक कोर्टात गेले. आधी मुंबई उच्च न्यायालयात गेले, आता नागपूर खंडपीठात गेले. गरीब भगिनींना आम्ही पैसे देत आहोत तर यांच्या पोटात का दुखतं?”असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला आहे. तसंच यावरुन यांची मानसिकता समजते असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Story img Loader