देशातल्या २० विरोधी पक्षांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळय़ावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींना निमंत्रण न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याने या सोहळ्याला विरोध होत आहे. केंद्र सरकारची भूमिका प्रजासत्ताक भारताच्या प्रमुखांचा आणि संविधानाचा अपमान आहे, अशी टीका करीत विरोधी पक्षांनी बुधवारी संयुक्त निवेदनाद्वारे या सोहळ्यावर बहिष्कार घालत असल्याचं जाहीर केलं आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतल्या (शिवसेना – ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस) पक्षांनीही या सोहळ्याला विरोध केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. शिंदे यांनी नव्या संसदेच्या उद्घाटनाला विरोध करणाऱ्यांवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, विघ्नसंतोषी लोक नव्या संसद भवनाच्या लोकार्पणाला विरोध करत आहेत. विरोध करणाऱ्यांना जनता जमाल गोटा देऊन धडा शिकवेल.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोक विघ्नसंतोषी असतात. अशा कार्यक्रमाला विरोध करणं हा लोकशाहीचा अपमान आहे. त्यांचा विरोध लोकशाहीला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते त्यांनी सांगावं. त्यांना ही जी काही पोटदुखी सुटलीय…. जनता सुज्ञ आहे, त्यामुळे जनता त्यांच्या पोटदुखीला चांगला जमाल गोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठीत एक म्हण आहे, नावडतीचं मीठही अळणी लागतं, तशी यांची गत आहे. मोदी साहेबांनी कुठलंही चांगलं काम केलं की त्याला विरोध करायचा असा प्रकार सुरू आहे.

हे ही वाचा >> “अमरावती लोकसभा लढवणार”, नवनीत राणांविरोधात बच्चू कडूंनी दंड थोपटले, म्हणाले, “मी स्वतः…”

दरम्यान, विरोधकांच्या बहिष्कारानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, नवे संसद भवन ही भारतीय संस्कृती आणि परंपरांशी आधुनिकतेची नाळ जोडणारी इमारत असून, समृद्ध लोकशाहीचे प्रतिक आहे.

Story img Loader