सांगली : शिवसेना-भाजप पवित्र युतीला डाग लावण्याचे काम ज्यांनी केले त्यांना सडेतोड उत्तर देऊन कसलीही पर्वा न करता काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आपण सोडवली, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी शिराळा, कामेरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल रात्री जाहीर सभा व बैठट पार पडली, तर इस्लामपूर येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी उमेदवार माने यांच्यासह सत्यजित देशमुख, निशीकांत पाटील, सदाभाऊ खोत, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Deputy Chief Minister Eknath Shinde criticizes Uddhav Thackeray jejuri pune news
ज्यांनी विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
dcm eknath shinde slams sharad pawar for his statement
विरोधकांच्या टीकेला कामातून उत्तर; एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
Eknath shinde bjp loksatta
एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळेच पालकमंत्री नियुक्तीला स्थगिती
bharat gogawale
पालकमंत्री निवडीवरून वाद, शिंदे गटातून संतप्त प्रतिक्रिया; गोगावले समर्थकांनी वाहतूक रोखली

हेही वाचा…सांगली : तपमान ४१ वर, प्रचारासह दैनंदिन कामावर परिणाम

मुख्यमंत्री म्हणाले, काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा जन्म कट, कमिशन आणि करप्शनसाठी झाला. त्यांच्याकडे अजेंडा नाही, नियत नाही आणि नेतासुद्धा नाही. मोदीजींवर बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. संविधान बदलणार असा खोटा प्रचार आणि संभ्रम पसरवण्याचे काम विरोधांकडून केले जात आहे, कारण त्यांना पराभव दिसतोय, असे ते म्हणाले.

हेही वाचा…मविआच्या एकसंघपणामुळे विजय निश्चित – चंद्रहार पाटील

ज्यांना खोक्याशिवाय झोप येत नाही, उठता बसता खोके पुरत नाहीत त्यांना कंटेनर लागतात, असे लोक बोलतात. कंटेनर कुठून कुठे पोहोचले हे हळूहळू बाहेर येईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी येथे दिला. बाळासाहेब म्हणायचे किंग बनण्यापेक्षा किंग मेकर बना परंतु त्यांच्या वारसांना सत्तेची हाव सुटली. हातचे सगळे घालवले, सोन्यासारखी माणसे गेली, पक्ष गेला. मात्र आपण सत्ता, खुर्चीसाठी कधीही बाळासाहेबांच्या विचारांबरोबर तडजोड करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

Story img Loader