Eknath Shinde discuss with Narendra Modi : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरील त्यांचा दावा सोडला आहे. त्यांनी आज (२७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज्यात महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र भाजपाकडून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली पाहून शिंदे यांनी माघार घेतली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “भाजपा व त्यांचं दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाबाबात व नव्या सरकारबाबत जो काही निर्णय घेईल तो निर्णय मला व शिवसेनेला मान्य असेल”. तसेच शिंदे यांना यावेळी विचारण्यात आलं की नव्या सरकारमध्ये तुमची भूमिका काय असेल? त्यावर शिंदे म्हणाले, “उद्या दिल्लीत आमच्या तिन्ही पक्षांची बैठक होईल. त्या चर्चेत माझी महायुतीच्या सरकारमधील भूमिका ठरेल”.
Eknath Shinde : मुख्यमंत्रीपदावरून माघार घेण्यापूर्वी पंतप्रधान मोदींशी काय बोलणं झालं? एकनाथ शिंदेंनी प्रत्येक शब्द सांगितला
Eknath Shinde on Narendra Modi : एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली.
Written by पॉलिटिकल न्यूज डेस्क
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-11-2024 at 16:29 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde steps back from maharashtra chief minister post talks with narendra modi asc