Eknath Shinde : महाराष्ट्रात महायुतीला जनतेने महाप्रचंड असा कौल दिला आहे. भाजपासह महायुतीला २३७ जागा मिळाल्या आहेत. यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? हा पेच सुटला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून ५ डिसेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता शपथ घेतील. त्याआधी आज महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. मंत्रिमंडळात असणार की नाही या प्रश्नावर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची संमती मागितली. राज्यपाल महोदयांनी संमती दिली. ५ डिसेंबरला संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी आहे. मला आनंद आहे की अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून शिफारस केली होती. आज मी शिवसेनेचं समर्थन असलेलं पत्र राज्यपालांना दिला आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, जे. पी. नड्डा यांनी जो निर्णय घेतला त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले. महायुतीला आजवरच्या इतिहासात कधीही इतकं मोठं बहुमत मिळालं नव्हतं. मी आजारी होतो तरीही अनेक बातम्या चालवण्यात आल्या. पण खेळीमेळीच्या वातावरणात सरकार स्थापन होतं आहे असं एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले.

Ravi Rana on Chief Minister
Ravi Rana : “जिसकी हिस्सेदारी….”, एकनाथ शिंदेंचे नाव घेत रवी राणांनी सांगितले मुख्यमंंत्रीपदाचे गणित
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Devendra Fadnavis EKnath shinde ajit Pawar
VIDEO : “शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी
Eknath Shinde News
Eknath Shinde : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का? उदय सामंत यांनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांनी…”
New CM of Maharashtra Devendra Fadnavis| BJP announced Maharashtra New Chief Minister
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”
Devendra Fadnavis new Chief Minister of Maharashtra
Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार; विधीमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!

देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून शिफारस करण्याची संधी मिळाली याचा आनंद

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नाव शिफारस करण्याची संधी मला मिळाली. राज्यातल्या जनतेला आम्ही सहकार्य करु शकलो. लोकांसाठी योजना फक्त जाहीर केल्या आणि तर त्या अंमलात आणल्या. आमच्या सरकारने उल्लेखनीय काम केलं आहे. आम्ही अनेक मोठे निर्णय घेतले असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. माझी प्रकृती आता सुधारते आहे असंही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी म्हटलं आहे.

महायुतीच्या सरकारच्या काळात आम्ही टीम म्हणून काम केलं-एकनाथ शिंदे

आमच्यात कुणी मोठा, कुणी लहान असं नव्हतं. आम्ही टीम म्हणून काम करत होतो. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्राला काय मिळालं हा प्रश्न मोठा होता. राज्य चालवतांना अनेक निर्णय आम्ही घेतले. विकास प्रकल्प मार्गी लावले. महाराष्ट्राला १० ते २० वर्षे मागे नेणारे निर्णय महाविकास आघाडीने घेतले होते. आमचं सरकार आल्यानंतर आम्ही प्रकल्प राबवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा यांनी आमच्या प्रस्तावांना मान्यता दिली. आमचं डबल इंजिनचं सरकार अडीच वर्षे चालवलं. त्याचा फायदा जनतेला झाला. मतदारांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमी आहेत असंही एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- VIDEO : “शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी

नव्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे असणार का?

नव्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे असणार का? असा प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे आम्ही संध्याकाळी सगळं सांगतो. देवेंद्र फडणवीस हे आमच्या भेटीला आले होते त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मी त्यांचे धन्यवाद देतो. काही वेळात मी तुम्हाला सांगतो. आम्ही एवढे निर्णय घेतले ते ऐतिहासिकच होते. मला खूप आनंद झाला आहे की अडीच वर्षांत महायुतीने खूप चांगलं काम केलं. इतिहासात हे निर्णय सुवर्ण अक्षरांत लिहिली जातील.” असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर अजित पवार चटकन म्हणाले संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदेंचा निर्णय कळेल. मी तर शपथ घेणार आहे. यावर एकच हशा पिकला. ज्यावर एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) म्हणाले, अजित पवारांना दुपारी काय पहाटे शपथ घेण्याचाही अनुभव आहे. यानंतर पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. तसंच कुठलाही गोंधळ गडबड नाही सगळं चित्र स्पष्ट होईल असं देवेंद्र फडणवीस यानंतर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं?

“आत्ताच आम्ही राज्यपालांची भेट घेतली आणि सत्तास्थापनेचा दावा केला आहे. नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे. ५ डिसेंबरला आम्हाला शपथविधीसाठीची वेळ देण्यात आली आहे. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महायुतीने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांना राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी निमंत्रण दिलं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार असे तिन्ही नेते तसंच इतर मान्यवर नेते हे राजभवनावर पोहचले होते.

Story img Loader