शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. सध्या उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आहेत. तर दुसरीकडे शिंदे गट आणि भाजपा एकत्र येत युतीच्या रुपात सत्ताशकट हाकत आहेत. दुसरीकडे वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाशी आघाडी करण्यास तयार असल्याची भूमिका घेतली आहे. याच कारणामुळे राज्यात आगामी काळात नवे सत्तासमीकर उदयास येणार का? असा प्रश्व विचारला जात आहे. असे असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> Gujarat Election 2022 : ‘भाजपाच्या गुंडांकडून आमच्या उमेदवाराचे अपहरण,’ आप पक्षाचा भाजपावर गंभीर आरोप, व्हिडीओ केला शेअर

shrikant shinde
कल्याणमध्ये महेश गायकवाड यांच्याकडून खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाची बॅनरबाजी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Sanjay Shirsat On Shivsena
Sanjay Shirsat : एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, ‘संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना…’
Shiv Sena Shinde group strategizes for party growth before upcoming Pune Municipal Corporation elections
पुण्यावर शिंदे गटाचा ‘आवाज’ वाढणार
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Thane , Eknath Shinde , Uddhav Thackeray group,
आरोप, शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
Eknath Shinde in Satara Dare Village on Maharashtra Government| Eknath Shinde said I am not Upset with Maharashtra Government
मी नाराज नाही – एकनाथ शिंदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृह येथे या द्वयींची भेट होणार असल्याचे वृत्त आहे. सध्या राजगृहात प्रकाश आंबेडकर राहतात. आगामी काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट होणार आहे, असे म्हटले जात होते. मात्र त्याआधीच एकनाथ शिंदे आज (१६ नोव्हेंबर) प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. या भेटीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणूक तसेच आगामी विधानसभा निवडणूक या विषयांवर या द्वयींमध्ये चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> शिवसेना आणि काँग्रेसशी युतीसाठी प्रकाश आंबेडकर तयार

ठाकरे-काँग्रेसशी युती करण्यास तयार- प्रकाश आंबेडकर

आगामी काळात घोषित महाालिका निवडणुका तसेच २०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसशी युती करण्यास तयार असल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्हाला उद्धव ठाकरे यांचे हिंदूत्व मान्य असल्याचेही प्रकाश आंबेडकर यापूर्वी म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेनंतर उद्धव ठाकरे गाटातील काही नेत्यांनीदेखील सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली होती. शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र आले तर महाराष्ट्रासाठी ही चांगली बाब ठरेल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी दिली होती.

हेही वाचा >>> ठरलं! डोनाल्ड ट्रम्प पुन्हा मैदानात, अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार

दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी अद्याप अधिकृतपणे भेट झालेली नाही. मात्र त्याआधीच एकनाथ शिंदे हे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात असल्यामुळे आगामी काळात कोणते राजकीय समीकरण उदयास येणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Story img Loader