महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. येत्या एक-दोन दिवसात सर्वोच्च न्यायालय यावर निकाल देऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

असीम सरोदे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय सोडून इतरांनी बोलणं चुकीचं आहे. वकिलांच्या विधानावर अंदाज बांधणं योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार, याचा अंदाज लावणं कुणालाही शक्य नाही, अशी प्रतिक्रिया शहाजीबापू पाटील यांनी दिली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

हेही वाचा- “…तर १६ आमदार अपात्र ठरतील”, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी विधानसभा उपाध्यक्षांचं मोठं विधान!

‘सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच एकनाथ शिंदे राजीनामा देतील’ या कायदेतज्ज्ञांच्या अंदाजाबाबत विचारलं असता शहाजीबापू पाटील म्हणाले, “या ‘जर आणि तर’च्या गोष्टी आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत अंदाज व्यक्त करणं, हे कायदेतज्ज्ञांच्याही पलीकडेचं आहे, असं मला वाटतं. न्यायालयात कोणताही खटला सुरू असला तरी दोन वकील दोन्ही बाजुने आपापली बाजू मांडत असतात. प्रत्येक वकील आपलीच बाजू बरोबर आहे, हे न्यायालयाला पटवून देत असतो.

हेही वाचा- “अजित पवारांनी मोदी-शाहांना दोनदा फसवलं”, प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

न्यायव्यवस्थेत वकील ही अशी व्यक्ती असते, जी आधीपासून मनात ठरवलेल्या बाजुनेच युक्तिवाद करते. आपलीच बाजू पटवून देण्याचं काम वकील करतात. त्यामुळे वकिलांच्या विधानावर अंदाज बांधणं योग्य नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सर्वोच्च न्यायालय सोडून इतर कुणीही बोलणं चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अंदाज कुणालाही घेत येऊ शकत नाही, असंही शहाजीबापू पाटील म्हणाले.