महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. तर, उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. या निकालानंतर विविध राजकीय प्रतिक्रिय उमटत आहेत.
Maharashtra Latest News: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी फक्त एक क्लिकवर...
निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. यानंतर खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. हवे तसे निकाल देण्यात येत आहेत. तीन महिन्यांपासून स्क्रिप्ट तयार आहे. अधिक खोके आणि भरवसा दिल्यानंतर शिवसेनेत फाटफूट घडवून आणली, असं टीकास्र संजय राऊतांनी सोडलं आहे.
"निकालावर चर्चा करता येत नाही. नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार परिणार होत नसते. काँग्रेसमध्ये वाद झाला. तेव्हा काँग्रेसची बैलजोडी ही खूण होती ती गेली. काँग्रेसने हात घेतला. लोकांनी मान्य केलं. नवीन चिन्ह मिळेल ते लोकं मान्य करतील. फार परिणाम होणार नाही," अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे.
"शिवसेना भवनावर दावा करायला मोगालाई आहे का?," असं हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
"पालिका निवडणूक लावण्यासाठीच आजचा निकाल दिला आहे. सेनेच्या स्थापनावेळीच्या मानसिकतेत आज आहे," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
"निवडणूक आयोगाला शेण खायचं होतं, तर कागदपत्र देण्याचा खटाटोप कशाला करायला लावला," अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.
"आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला आहे. नामर्द किती जरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही. लवकरात लवकर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे, तोपर्यंत धनुष्यबाणाचे पेढे खाऊद्या. ही लढाई शेवटपर्यंत लढाई लागणार. आता मैदानात उतरलो आहे, विजयाशिवाय शांत बसणार नाही," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
"धनुष्यबाण चोरला तरी तो कागदावर राहणार आहे. रावणाकडे आणि रामाकडेही धनुष्यबाण होते. १०० कौरव एकत्र आले तरी पांडव हरले नव्हते. हा अन्याय झालेला अनेकांना मान्य नाही. हा छत्रपतींचा महाराष्ट्र, धृतराष्ट्र नाही. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"निवडणूक आयोगाने दिलेला निकाल लोकशाहीच्या दृष्टीने दिलेला अत्यंत घातक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यातून घोषणा करावी की, लोकशाही संपली आहे. सरकारची दादागिरी सुरु आहे," अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
"मला अतिशय अनपेक्षित निकाल आला आहे. उद्धव ठाकरेंनी मागणी केली होती, सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने २१ फेब्रुवारीपासून दोघांचं मत ऐकणार, असं असताना ऐवढी घाई का केली. निवडणूक आयोगाने निर्णय दिला, तरी उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जातील. न्याय नाही मिळाला तर सर्वोच्च न्यायालयात जाता येत. महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिल," असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवारांनी व्यक्त केला.
"हवे तसे निकाल देण्यात येत आहेत. तीन महिन्यांपासून स्क्रिप्ट तयार आहे. अधिक खोके आणि भरवसा दिल्यानंतर शिवसेनेत फाटफूट घडवून आणली. त्यांना काही करुन बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नष्ट करुन बाजार बुणग्यांच्या हातात पक्ष देणार होता. मोदी-शाहा यांच्या भाजपाने ते करुन दाखवलं, पण महाराष्ट्र सुड घेतल्याशिवाय राहणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी रक्त आणि घाम गाळून शिवसेनेची बीज रोवली आणि आमच्यासारख्या अनेक पिढ्या उभ्या केल्या, ती शिंदेंची कशी होऊ शकते," असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
"आज खरा सत्याचा विजय झाला आहे. निवडणूक आयोगाने हा मोठा निर्णय दिला आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि नाव आम्हाला मिळालं. आमची बाजू सत्याची आणि न्यायाची असल्याने आमच्या बाजूने निर्णय लागला आहे. आम्ही काहीचं केलं नाही, हे पहिल्या दिवसापासून सांगत आहे. आज अखेर आम्हाला न्याय मिळाला आहे. बाळासाहेबांचे आशीर्वाद आमच्या बाजूने आहेत," अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे.
देशातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे. त्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदविण्यात आली आहे. “जनता आमच्या सोबत आहे. आम्ही नवीन चिन्ह घेऊन जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि शिवसेनेला पुन्हा उभी करुन दाखवू.”, असे आव्हान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे ८.३० वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
लोकशाहीचा आणि भारतीय घटनेचा हा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली आहे. आता शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढची वाटचाल करू असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
देशातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाची आगामी रणनीती काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.