ब्राह्मण समाजाविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राजू शेट्टी यांच्यावर निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल केला आहे. हातकणंगले पोलिस ठाण्यात आचारसंहिता भंग आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथे प्रचार सभेवेळी शेट्टी यांनी सीमेवर लढणार्‍या जवानांच्या संदर्भात बोलताना ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचा ब्राम्हण समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. जवानांना कोणतीही जात नसते. ते देशवासियांचे संरक्षण करत आपले कर्तव्य बजावत असतात. पण राजू शेट्टी यांनी त्यांचा राजकारणासाठी वापर करत केलेले वक्तव्य निषेधार्ह असल्याचे समाजाचे मत आहे.

याप्रकरणी ब्राह्मण समाजाच्यावतीने निवडणूक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याआधारे निवडणूकनिर्णय अधिकाऱ्यांनी राजू शेट्टी यांना नोटीस पाठवली होती. नोटिसीला उत्तर न दिल्याने निवडणूक विभागाचे भरारी पथक क्रमांक ३ चे प्रमुख मेघराज घोडके यांनी हातकणंगले पोलिस ठाण्यात दिली फिर्याद दिली. शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे मंहाआघाडीचे उमेदवार आहेत. पोलीस निरीक्षक सीताराम डुबल तपस करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election commission complain against raju shetty