निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगने घेतलेला हा निर्णय म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी धक्का असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयानंतर आम्ही लवकरच आमची आगामी रणनीती ठरवू अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील नेते भरत गोगावले यांनी दिली आहे. तर या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागू असे उद्धव ठाकरे समर्थक चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय धक्कादायक असल्याचेही खैरे म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं; शिवसेना नावाचाही करता येणार नाही वापर

Nagpur strength of uddhav Thackeray shivsena
शिवसेना ठाकरे गटाचे नागपुरात स्वबळ किती? निष्ठावानांकडे कायम दुर्लक्ष केल्याने पक्षाची घसरण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Amit Deshmukh On BMC Election 2025
Amit Deshmukh : ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेनंतर काँग्रेसची भूमिका काय? अमित देशमुखांचं मोठं भाष्य; म्हणाले, “आम्ही देखील…”
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”
Humiliating behaviour in Uddhav Thackeray group Jalgaon district womens organizer Mahananda Patil alleges
उद्धव ठाकरे गटात अपमानास्पद वागणूक, राजीनामा देताना जळगाव जिल्हा महिला संघटक महानंदा पाटील यांचा आरोप
Chandrashekhar Bawankule Answer to Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे अतिविलासी, मातोश्री २ च्या…”, मोदींवर टीका केल्यानंतर भाजपाचं उत्तर

आम्हा कोट्यवधी शिवसैनिकांना दु:ख झाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयात १६ आमदारंच्या निलंबनाची याचिका प्रलंबित असताना हा निर्णय घेतला गेला. आता शिवसेना नावही वापरता येणार नाही, याचे आम्हाल दु:ख झाले आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी दिली.

हेही वाचा >>> “निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय..,”धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या निर्णयानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी शिवसेना उभी केली होती. मात्र एका माणसाने शिवसेना पक्ष फोडला आहे. त्यांचे हे पाप कधीही मिटू शकणार नाही. म्हणूनच आमचा त्यांच्यावर राग आहे. बाळासाहेबांनी मोठ्या कष्टाने शिवसेना उभारली होती. एका व्यक्तीने सगळा नाश केला. आम्ही पुढे सर्वोच्च न्यायालयात जाऊ, अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली.

हेही वाचा >>> निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया; अनिल परब म्हणाले…

आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाणार

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे समर्थकांचा गट न्यायालयाचे दार ठोठावणार आहे. तशी माहिती चंद्रकांत खैरे यांच्यासह खासदार अरविंद सावंत यांनीही दिली आहे. निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे, ते पाहता या सर्व प्रकाराचा तपास व्हायला हवा. सध्या देशात काय सुरु आहे? आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहोत, अशी माहिती अरविंद सावंत यांनी दिली.

पाहा व्हिडीओ –

निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला?

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांना आगामी निवडणुकीसाठी शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटांना धनुष्यबाण या चिन्हाचाही वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटाला दोन वेगवेगळी चिन्हे दिली जातील.

Story img Loader