बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोदामामधील सीसीटीव्ही प्रणाली ४५ मिनिटे बंद होती, असा दावा महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ पोस्ट निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ईव्हीएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटीव्ही बंद पडणं ही बाब संशयास्पद आहे, असे त्या म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी ठेवल्या आहेत, तेथील सीसीटीव्ही कॅमेरे आज सकाळी ४५ मिनिटे बंद होते. ईव्हीएमसारखी अतिशय महत्वाची गोष्ट जेथे ठेवलेली आहे, तेथील सीसीटीव्ही बंद पडणे ही बाब संशयास्पद आहे. तसेच हा खूप मोठा हलगर्जीपणादेखील आहे. याबाबत निवडणूक प्रतिनिधींनी संबंधित अधिकारी आणि प्रशासनाला संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे आलेली नाहीत. तसेच या ठिकाणी टेक्निशियनदेखील उपलब्ध नाही, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Fair Play Betting App, IPL Broadcast , ED ,
फेअर प्ले बेटिंग अ‍ॅप आयपीएल बेकायदा प्रक्षेपण प्रकरण: ईडीकडून आतापर्यंत ३३५ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?

पुढे बोलताना या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. आमच्या प्रतिनिधींना ईव्हीएमच्या स्थितीची पाहणीदेखील करु दिली जात नाही. हे अतिशय गंभीर आहे. निवडणूक आयोगाने तातडीने याची दखल घेऊन सीसीटीव्ही का बंद पडला, याची कारणे जाहीर करावी. याखेरीज संबंधित घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – “दमदाटी करणाऱ्यांना विनम्रपणे सांगायचंय की…”, सुप्रिया सुळेंचा टोला; अजित पवारांना प्रत्युत्तर!

निवडणूक अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण :

दरम्यान, याप्रकरणी आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी कविता द्विवेदी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोदामात बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदान झालेली मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असून इलेक्ट्रेशियन काम करत असताना त्याने एक वायर काढलेली असल्याने दूरचित्रवाणीच्या पडद्यावर चित्रिकरण काही वेळ दिसत नव्हते. मात्र याबाबत तातडीने चौकशी करून संबंधित यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली आहे, असे त्या म्हणाल्या.

पोलीस कर्मचारी भाजपाचा प्रचार करत असल्याचाही केला आरोप

याशिवाय सुप्रिया सुळे यांनी आणखी एक व्हिडीओ पोस्ट करत एका मतदान केंद्रावरील पोलीस अधिकारी भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करत असल्याचाही आरोप केला. पाथर्डी तालुक्यात मतदान प्रक्रिया राबविणारा कर्मचारीच भाजपा उमेदवाराचा प्रचार करीत असल्याचा एक व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. जर हा व्हिडीओ खरा असेल तर हे निपःक्ष मतदान प्रक्रिया आणि सशक्त लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय घातक आणि चिंताजनक आहे, असे त्या म्हणाल्या.

पुढे बोलताना, निवडणूक आयोगाने या व्हिडीओची खातरजमा करुन जर हा व्हिडीओ खरा असेल, तर संबंधित व्यक्तीची चौकशी करुन त्याच्यावर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Story img Loader