सांगली : भाजप अन्य राज्यात वाढण्यासारखी स्थिती नसल्याने महाराष्ट्रात भाजपचे अधिक लक्ष आहे. यंदाचे वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असून देशाच्यादृष्टीने निर्णायक ठरणार आहे असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या निवासस्थानी आमदार चव्हाण यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अन्य राज्यात भाजपला अनुकूल स्थिती दिसत नाही. यामुळे महाराष्ट्रावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यातूनच प्रयोग सुरू झाले. पहिला प्रयोग शिवसेनेनवर आणि त्यानंतर राष्ट्रवादीवर करण्यात आला. यापुढील काळातही असे प्रयोग थांबतील असे वाटत नाही. पक्षातून नेते बाहेर पडले ते वैयक्तिक स्वार्थासाठीच. जनतेला मूळ पक्षाशी नेत्यांनी केलेली गद्दारी आवडली नाही. फितुरी महाराष्ट्रातील जनता कधीही मान्य करत नाही.
आमदार अपात्र प्रकरणी सध्या विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी सुरू असून अध्यक्षांना कायद्यानुसार निर्णय घ्यावा लागणार आहे. तसे जर झाले नाही तर सर्वोङ्ख न्यायालयाची काय भूमिका घेणार हे पाहायला हवे. विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर निर्णय घेतील तो पहिला भूकंप असेल. पक्षांतर बंदी कायदा हा कुचकामी असून तो कचर्याच्या डब्यात फेकून द्यायला हवा.
राममंदिर हे केवळ भाजपचे नाही तर तमाम रामभक्तांचे आहे.यामुळे याचा लोकसभा निवडणुकीवर काही परिणाम होईल असे वाटत नाही. लोकसभेवेळी मतदान महागाईच्या मुद्द्यावरय होईल असेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीवेळी अधिकाधिक उमेदवार उभे करून मत विभाजन करण्याची रणनीती भाजपकडून आखली जाईल. मत विभाजन टाळण्याचा इंडियाचा प्रयत्न असून बहुजन वंचित आघाडीनेही इंडिया आघाडीत सहभागी व्हावे असे आपले मत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आणखी वाचा-“अजितदादाच आता ज्येष्ठ नागरिक आहेत…”, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “रोहित पवारांच्या वयात शरद पवार…”
जर नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान झाले तर देशाची घटनाच बदलली जाण्याची भीती व्ययत केली जात आहे. यासाठी मतदारांनीही आता कोणत्याही भूलथापांना बळी न पडता मतदान करण्याची गरज आहे असेही आमदार चव्हाण यावेळी म्हणाले.