राज्यातील विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार १३ सप्टेंबर २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र २१ ते 27 सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे २४ व २५ सप्टेंबर २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २८ सप्टेंबर २०२२ होईल.

Congress Complete Candidate List in Marathi
Congress Candidate List: राष्ट्रीय पक्षांचा राज्यात तंटा, महाराष्ट्रात ‘इतक्या’ ठिकाणी काँग्रेस भाजपाला थेट भिडणार; वाचा पक्षाच्या उमेदवारांची संपूर्ण यादी!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Vanchit Bahujan Aghadi, Bahujan Samaj Party,
आंबेडकरी पक्षांच्या उमेदवारांचा वेलू गगनावरी !
Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
158 parties in the 2086 independent candidate contest maharashtra assembly election 2024
१५८ पक्ष, २०८६ अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात
65 percent voter turnout recorded in first phase of jharkhand assembly polls
पहिल्या टप्प्यात ६५ टक्के मतदान; झारखंडमध्ये माओवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनाकडे मतदारांचे दुर्लक्ष
Kalyan Dombivli assembly election campaign wage rates labour
कल्याण-डोंबिवलीत प्रचार टिपेला, मजुरीचे दर शिगेला; प्रचारासाठी लागणाऱ्या मजुरांचे दर २५० ते १२०० रूपये

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १३ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या:

ठाणे

कल्याण- ७, अंबरनाथ- १, ठाणे- ५, भिवंडी- ३१, मुरबाड- ३५, व शहापूर- ७९. पालघर: डहाणू- ६२, विक्रमगड- ३६, जवाहार- ४७, वसई- ११, मोखाडा- २२, पालघर- ८३, तलासरी- ११ व वाडा- ७०.

रायगड

अलिबाग- ३, कर्जत- २, खालापूर- ४, पनवेल- १, पेण- १, पोलादपूर- ४, महाड- १, माणगाव- ३ व श्रीवर्धन- १. रत्नागिरी: मंडणगड- २, दापोली- ४, खेड- ७, चिपळूण- १, गुहागर- ५, संगमेश्वर- ३

रत्नागिरी- ४, लांजा- १५ व राजापूर- १०

सिंधुदुर्ग

दोडामार्ग- २ व देवडगड- २

नाशिक

इगतपुरी- ५, सुरगाणा- ६१, त्र्यंबकेश्वर- ५७ व पेठ- ७१

नंदुरबार

अक्कलकुवा- ४५, अक्राणी- २५, तळोदा- ५५ व नवापूर- ८१

पुणे

मुळशी- १ व मावळ- १

सातारा

जावळी- ५, पाटण- ५ व महाबळेश्वर- 6

कोल्हापूर

भुदरगड-१, राधानगरी-१, आजरा-१ व चंदगड-१

अमरावती

चिखलदरा-१

वाशीम- १

नागपूर: रामटेक- ३, भिवापूर- ६ व कुही- ८.

वर्धा: वर्धा- २ व आर्वी- ७

चंद्रपूर

भद्रवाती- २, चिमूर- ४, मूल- ३, जिवती- २९, कोरपणा- २५, राजुरा- ३० व ब्रह्मपुरी- १.

भंडारा

तुमसर-१, भंडारा-१६, पवणी-२ व साकोली-१.

गोंदिया

देवरी-१, गोरेगाव-१, गोंदिया-१, सडक अर्जुनी-१ व अर्जुनी मोर-२

हेही वाचा : अमित शहा यांना मुंबई महापालिका निवडणूक तयारीसाठी यावे लागते हा शिवसेनेचा नैतिक विजय ; अंबादास दानवे यांचे वक्तव्य

गडचिरोली

चामोर्शी-२, आहेरी-२, धानोरा-६, भामरागड-४, देसाईगंज-२, आरमोरी-२, एटापल्ली-२ व गडचिरोली-१.