चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात मागील १० वर्षांत १६०८२२.३१७ मेगावॉट वीज निर्मिती झाली आहे. येत्या काळात विस्तारित प्रकल्पातील संच क्रमांक ८ व ९ कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे वीजनिर्मितीत वाढ होण्यासोबतच प्रदूषणातही प्रचंड मोठय़ा प्रमाणात वाढ होणार आहे.
ही वीज निर्मिती सात संचातून करण्यात आली आहे. मात्र, आता १ व २ हा संच बंद करण्यात आल्यामुळे वीज निर्मिती कमी झाली आहे. आता फक्त ३, ४, ५, ६ व ७ हे पाचच संच सुरू आहे. या केंद्रात संच क्रमांक १ व २ हा प्रदूषणाचे व त्यांचा कालावधी संपल्याचे कारण सांगत बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता फक्त उरलेल्या ३, ४, ५, ६ व ७ या संचातूनच १९२० इतकीच वीज निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे ४२० क्षमता असलेल्या व बंद झालेल्या दोन संचामुळे वीज निर्मिती कमी होत आहे. विशेष म्हणजे, कमी झालेली वीज निर्मिती ही नव्याने सुरू होत असलेल्या ८ व ९ या संचामुळे वाढणार आहे. आधी एकूणच सात संचांमधून २३४० इतकी मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येत होती. मात्र, १ व २ हे संच बंद झाल्यामुळे आता फक्त १९२० मेगावॉट वीज निर्मिती करण्यात येत आहे. संच १ व २ बंद झाल्यामुळे वीज निर्मिती खालावली आहे. मात्र, नव्याने सुरू होणारे ८ व ९ या संचाचे काम पूर्ण झाले असून हे संच लवकरच सुरू होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा वीज निर्मिती वाढणार आहे.
या केंद्रातील वीज इतर राज्यातही पाठवण्यात येते. मात्रस १ व २ हे संच बंद झाल्यामुळे या विजनिर्यातीवर परिणाम झाला आहे. सोबतच वीज कमी निर्माण होत असल्यामुळे येत्या उन्हाळ्यात लोड शेडिंगला नागरिकांना सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर हे लोडशेडिंग आताच सुरू झाली, तर नागरिकांना या उन्हाळ्यात अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. कमी विजनिर्मितीमुळे या वीज केंद्राच्या उत्पनातही घट झाली आहे. मात्र, १ व २ हे संच बंद झाल्यामुळे काही प्रमाणात हा होईना प्रदूषण कमी झाल्याचे बोलले जात असले तरी ८ व ९ हे संच सुरू झाल्यावर शहरातील प्रदूषणाची स्थिती ’जैसे थे’ होणार आहे. मागील दहा वर्षांत या वीज केंद्रात १६०८२२.३१७ मेगावॉट विजनिर्मिती झाली. मात्र, येत्या काळात ८ व ९ हे दोन संच सुरू होत असल्यामुळे विजनिर्मिती वाढणार आहे. सोबतच हा संचामुळे आणखी किती प्रदीषणात भर पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader