कराडच्या (जि. सातारा) पाल येथील मरतड देवस्थानचा गजराज ‘राजेंद्र ऊर्फ रामप्रसाद’ला दीर्घकाळ साखळदंडांमध्ये जखडून ठेवण्यात आले होते. आजारपणामुळे त्रस्त असलेल्या या गजराजाच्या वेदनांना अंत नव्हता. त्याची व्यथा पीपल फॉर अॅनिमल या संघटनेसाठी काम पाहणाऱ्या खासदार पूनम महाजन यांच्यापर्यंत पोचली. मग चक्रे फिरली आणि बऱ्याच धावपळीनंतर गजराजाची सुटका करण्यात आली. आता त्याची रवानगी सोमवारी मथुरा येथे वैद्यकीय उपचारांसाठी करण्यात आली असून तेथेच त्याला वेदनांमधून मुक्ती मिळणार आहे.
गजराजाला प्रदीर्घ औषधोपचाराची गरज होती व हा खर्च देवस्थानला परवडणारा नव्हता. ही माहिती केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या पीपल फॉर अॅनिमल संघटनेपर्यंत पोचली. पूनम महाजन यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याशीही संपर्क साधला. प्राण्याच्या संगोपन व देखभालीसाठी कायदा व नियम असून त्यांचा भंग होत होता. पण कार्तिक सत्यनारायण या प्राणिमित्राच्या मदतीने महाजन यांनी मथुरा येथील हत्तींवरील उपचार केंद्राशी संपर्क साधला. राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांच्या कानावर या बाबी घालून गजराजाला तेथे हालविण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आल्या.
सोमवारी त्याला मथुरेला पाठविण्यात आले आहे. तेथे पोचल्यावर लगेच उपचार सुरू होतील आणि त्याला पुढील काळात तेथेच ठेवले जाईल, अशी माहिती महाजन यांनी दिली.
राजेंद्र गजराजाची साखळदंडांतून सुटका
प्राण्याच्या संगोपन व देखभालीसाठी कायदा व नियम असून त्यांचा भंग होत होता.
Written by उमाकांत देशपांडे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-12-2015 at 03:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elephant to get medical treatment at mathura