भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याही आकस्मिक जाण्याने महाराष्ट्राचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे कधीही न भरून येणारे अपरिमित नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
मुंडे हे लोकनेते होते. तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांनी पक्ष वाढविला. खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र पोरका झाला असून महाराष्ट्राचा बुलंद आवाज शांत झाल्याची भावना दानवे यांनी व्यक्त केली.
बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी मुंडे यांच्या आकस्मिक निधनामुळे महायुतीचेच नव्हे, तर सर्व समाजाचे प्रचंड नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. लोकनेते मुंडे यांना गोरगरीब व तळागाळातील जनतेविषयी आत्यंतिक तळमळ होती. राज्याबरोबरच मराठवाडय़ाच्या विकासासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले. ते उत्कृष्ट वक्त होते. समयसूचकता हा त्यांच्या वक्र्तृत्वाचा मोठा गुण होता. मनमोकळ्या स्वभावामुळे सर्वच पक्षांमध्ये त्यांचे जिवाभावाचे अनेक मित्र होते, असेही खोतकर यांनी आठवणी जागवताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा