करोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. दुसरीकडे राज्यात राज्यात ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगारांना रोजगार दिल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये रोजगार मिळवून देण्यात आला आहे. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आला होता. तर चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्टअखेर १ लाख ११ हजार ०८३ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
“ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ जणांना रोजगार दिला”; कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
राज्यात राज्यात ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगारांना रोजगार दिल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 14-09-2021 at 15:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employed 17372 people in august says information of skill development minister nawab malik rmt