कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी कराड-चिपळूण हा सुमारे १११ किलोमीटर लांबीचा रेल्वे लोहमार्ग व्यावहारिकदृष्टय़ा योग्य आहे. राज्य शासनाने यासाठी ९२० कोटींपैकी पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे कराड-चिपळूण रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी जिल्हा नियोजन समितीने ठराव करावा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी आहे. कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
उदयनराजे यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गतिमान उद्योग, व्यवसाय वाढीसाठी दळणवळणाच्या चांगल्या सुविधा असणे आवश्यक आहे. कोकणातून पश्चिम महाराष्ट्रातील एकंदरीत विकासासाठी कोकणभूमी पश्चिम महाराष्ट्राला लोहमार्गाने जोडण्याची गरज ओळखून जिल्ह्यातील कराड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या दोन मध्य-मोठय़ा शहरांना जोडणारा लोहमार्ग प्रस्तावित करावा, अशी मागणी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री यांना आपण केली होती. त्यानुसार या मार्गाने सर्वेक्षण झाले. एकूण १११ किलोमीटरचा लोहमार्गाची आखणी करण्यात आली आहे. सह्याद्री डोंगररांगांच्या नैसर्गिक व अवघड रचनेचा हा मार्ग अन्य ठिकाणच्या मार्गाच्या तुलनेत सोईस्कर, व्यावहारिक व नैसर्गिकदृष्टय़ा सुयोग्य ठरणार आहे. त्यामुळे या मार्गाच्या निर्मितीसाठी जिल्हा नियोजन आणि विकास समितीमध्ये एकमताने ठराव करण्यात यावा अशी भूमिका उदयनराजे यांनी मांडली आहे.
‘कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी खर्चातील पन्नास टक्के भाग उचलणार’
केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार; गुरुवारी बैठक
वार्ताहर, सातारा
कोकण भूमी महाराष्ट्राला जोडण्यासाठी कराड-चिपळूण हा रेल्वे मार्ग व्यावहारिकदृष्टय़ा योग्य असून राज्य शासनाने पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. नियोजन समितीच्या बठकीत हा ठराव मंजूर करावा केंद्र सरकारकडे आपण त्याचा पाठपुरावा करू, असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्याची नियोजन मंडळाची बठक दि. २९ रोजी होत आहे. या पाश्र्वभूमीवर त्यांनी केलेल्या या आवाहनाला विषेश महत्त्व आहे.
खा.भोसले पुढे म्हणाले, राज्य शासनाने या मार्गाच्या एकूण ९२० कोटी रुपयांच्या खर्चापकी निम्मा खर्च उचलण्याचे कबूल केले आहे. तसेच २९ जानेवारी २०१० रोजी याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. केवळ पाठपुरावा करणे हा भाग महत्त्वाचा आहे आणि आपण तो करण्यास तयार आहोत.
या पूर्वी आपण तत्कालीन रेल्वेमंत्र्यांना हा रेल्वे मार्ग करण्याची मागणी केली होती. त्यानुसार या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार १११ किलोमीटर लांबीच्या मार्गाची लोहमार्गाची आखणी करण्यात आली. सह्याद्री डोंगर रांगांचा विचार करता हाच मार्ग सर्वात व्यवहार्य तसेच नसर्गिकदृष्टय़ा योग्य आहे. या मार्गामुळे कराड, रत्नागिरी आणि चिपळूण ही गावे जोडली जाणार आहेत तसेच व्यापार, उद्योग वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यासाठी सातारा जिल्हा नियोजन आणि विकास समितीमध्ये या लोहमार्गाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात यावा असे आवाहन खासादर भोसले यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा