वाई: औरंगजेब,अफजल खानाचे उदात्तीकरण करणाऱ्यांनी महाराष्ट्र सोडावा असे स्पष्ट मत आ. शिवेद्रसिंहराजे यांनी व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, अफजलखान हा काही देव नव्हता, स्वराज्यावर चालून आलेला तो एक सरदार होता. स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

औरंगजेब आणि अफजल खान महाराष्ट्रात येताना त्यांनी अनेक देवळे तोडली होती. अत्याचार करतच ते महाराष्ट्रात आले होते अशा लोकांचे राजकारणासाठी किंवा राजकीय सोयीसाठी उदात्तीकरण करणाऱ्या लोकांनी महाराष्ट्र सोडावा असे स्पष्ट मत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज अथवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल इतिहास तोडून मोडून बोलणे की एक फॅशन झाली आहे. खरा इतिहास सोडून आपले काहीतरी मांडत राहणे ही सवय लोकांना लागत आहे, ही दुर्दैवी बाब आहे.

हेही वाचा >>> कांदाटी खोऱ्यातील गावांचा विकास होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

इतिहासाच्या नोंदी, खरा इतिहास बाजूला ठेवून  सध्या काही लोकांकडून चर्चा सुरू आहे. अशा चर्चा सुरू करून आपण खरा इतिहासाला कमी लेखत  आहोत, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. औरंगजेब आणि अफजलखानाचा उदात्तीकरण, दैवतीकरण करणे हे चुकीचेच आहे. राजकीय हेतू समोर ठेवून जर असे कोण करत असेल तर त्यांनी सरळ सरळ महाराष्ट्र सोडून जावे.

हेही वाचा >>> VIDEO : विश्वजीत कदम देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, भाजपात जाण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण!

स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आलेल्या सरदार अफजलखानाचा शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर वध केला.पण या विषयाची वेगळी चर्चा करणे खरोखरच दुर्दैवी आहे. याविषयी उदयनराजे काही बोलले नाहीत याबाबत विचारले आता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. राज्यपाल जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हा त्यांनी तो विषय मांडला होता. परंतु आत्ताच्या विषयावरती का बोलले नाहीत हे मला सांगता येणार नाही. औरंगजेब आणि अफजलखान हे महाराष्ट्रावर स्वारी करत करून येत असताना त्यांनी मंदिरांची तोडफोड करत जनतेवर अत्याचार केले. त्यांवं उदात्तीकरण कसलं करता असा प्रश्नही उपस्थित केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ennoblement aurangzeb afzal khan should leave maharashtra criticism of shivedrasinh raje ncp ysh