दापोली : दापोली तालुक्यातील किरांबा येथील डोंगराला तडा गेल्यामुळे पायथ्याशी असलेल्या लोकवस्ती तातडीने स्थलांतर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दापोली तालुक्यामध्ये गेले काही दिवस अतिमूसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नद्यांना पूर येऊन पाणी शेतात, वस्तीत शिरून खूप मोठे नुकसान झाले. तर काही ठिकाणी दरड कोसळून, झाडे पडून घरांचे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे. याच अतिवृष्टीमुळे दापोली तालुक्यातील किरांबा येथील गावातील डोंगराला ५ ते ६ फूट खोल भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा डोंगर धोकादायक ठरत आहे.

हेही वाचा…कोकणात १ ऑगस्टपासून मासेमारी सुरु होणार, मात्र वादळी वारे आणि पावसाची मच्छीमारांना चिंता

येथील ग्रामस्थांच्या हे निदर्शनास आल्यावर येथील डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या लोकवस्तीमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. येथील डोंगराला भेगा पडत गेल्याने लगतच्या रस्त्याला देखील भेगा पडू लागल्या आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता देखील बंद केला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना दैनंदिन व्यवहारासाठी किमान एक किमीची पायपीट करावी लागत आहे. यातच शासनाने त्याठिकाणाहून स्थलांतर करण्याचे आदेश लोकांना दिले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Evacuation ordered in dapoli s kiramba village due to mountain cracks psg