Sharad Pawar PC: अजित पवार यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. निवृत्त व्हायचं एक वय असतं. सरकारी कर्मचारी ५८ व्या वर्षी निवृत्त होतात. भाजपात निवृत्त व्हायचं वय ७५ च्या पुढचं आहे. अशात ८२, ८३ वय झालं तरीही आमचे वरिष्ठ थांबत का नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी केला होता. त्यावर आता शरद पवारांनी जोरदार उत्तर दिलं आहे. दिल्लीत राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले शरद पवार ?

“मी कुठेही थांबण्याचा प्रश्नच येत नाही. मी आता आणखी जोमाने काम करणार आहे. वय ८२ होऊ द्या किंवा ९२ होऊ द्या. असं म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना उत्तर दिलं आहे. “

हे पण वाचा- “मी सुप्रियाला म्हटलं होतं तू शरद पवारांना समजावून सांग…”, अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत

मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष

“मी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे. दुसऱ्या कुणी काय म्हटलं? त्याला काही अर्थ नाही. कोण काय म्हणतंय त्याच्याशी मला काही करायचं नाही. आजही जी कार्यकारिणी झाली ती माझ्या अध्यक्षतेखाली झाली असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.”

हे पण वाचा “आपलं नाणं खोटं आहे हे त्यांना माहित असल्यानेच…”, शरद पवारांचं अजित पवारांना जोरदार प्रत्युत्त

अजित पवार शरद पवारांबाबत काय काय म्हणाले होते?

“आता नवी पिढी पुढे येते आहे. तुम्ही आशीर्वाद द्या ना.. चुकलं तर सांगा की अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करुन दुरुस्त करुन पुढे जाऊ. पण हे कुणासाठी चाललं आहे? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? मित्रांनो आज आपले वरिष्ठ नेते यशवंत राव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले होते. यशवंतराव हे आपलं दैवतच आहेत. माझ्याकडूनही चूक झाली होती तेव्हा मी एक दिवस आत्मक्लेश केला होता. मला माझंच वागणं मनाला लागलं होतं. आता जर वय जास्त झालं ८२ झालं, ८३ झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का? वयाच्या बाबतीत तर आम्हाला वाटतं की तुम्ही शतायुषी व्हावं.

राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला ?

मला हे सांगण्यात आलं की मी राजीनामा देतो, संस्था बघतो. त्यानंतर एक कमिटी करतो, त्या कमिटीत तुम्ही सगळे प्रमुख बसा. ते बसून सुप्रियाला राष्ट्रीय अध्यक्ष करा सांगितलं त्यालाही आम्ही तयार झालो. त्यानंतर दोन दिवसांत काय घडलं कुणास ठाऊक? त्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? मला महाराष्ट्राने सांगावं की आमच्यात धमक आहे की नाही? जे प्रमुख नेते म्हणून पाहिले जातात त्यात माझं नाव शेवटी का होईना येतं ना? मग मला का आशीर्वाद का दिला जात नाही. शेतकरीही ६० वर्षांचा झाला की २५ वर्षांच्या मुलाला सांगितलं जातं आता शेती तू बघायची आणि आम्ही तुला सल्ला देऊ.

मी सुप्रियाला विचारलं हा नेमका कुठला हट्ट?

मी सुप्रियाशीही बोललो, सुप्रिया आपण एका घरातले, एका कुटुंबातले आहोत त्यांना काहीतरी सांग. त्यावर सुप्रिया म्हणाली ते हट्टी आहेत. हा नेमका कसला हट्ट आहे? शरद पवारांविषयी आम्हाला खूप आदर आहे. पण त्यांनी थांबलं पाहिजे

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Even if i turn 82 or 92 i will continue to work vigorously sharad pawar strong reply to ajit pawar scj