कोल्हापूर : पूरस्थितीमुळे रुग्णांची होणारी परवड आणि वैद्यकीय यंत्रणेची तत्परता असे वेगळेच दर्शन कोल्हापुरात एका रुग्णाच्या उपचाराच्या निमित्ताने घडले आहे.
हेही वाचा – “भाजपने हरवले; मग आम्ही त्यांची बी टीम कशी?”, प्रकाश आंबेडकर यांची विचारणा
हेही वाचा – पंचगंगा धोका पातळीच्यावर कायम; सांगलीतील ८० कैदी कोल्हापुरात हलवले
कोल्हापूर : पूरस्थितीमुळे रुग्णांची होणारी परवड आणि वैद्यकीय यंत्रणेची तत्परता असे वेगळेच दर्शन कोल्हापुरात एका रुग्णाच्या उपचाराच्या निमित्ताने घडले आहे. जिवाची पर्वा न करता डॉक्टरांनी रुग्णाला स्ट्रेचरवर घेत पुराच्या पाण्यातून चालत प्रवास केला. pic.twitter.com/2jrkpvKdhF
— LoksattaLive (@LoksattaLive) July 26, 2024
त्याचे असे झाले. कोल्हापूर – गगन बावडा मार्गावरील साखरी या गावात पांडुरंग मेंगाने हे घरात घसरून पडल्याने जखमी झाले. ग्रामस्थांनी १०८ क्रमांकावरून संपर्क साधल्यानंतर हिरवे प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका दाखल झाली. पुढे रस्त्यात पुराचे पाणी आल्याने काय करायचे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला. जिवाची पर्वा न करता डॉ. सुरज नलावडे, डॉ. पूनम मगदूम, सतीश कांबळे, भारत पाटील आदींनी रुग्णाला स्ट्रेचरवर घेत पुराच्या पाण्यातून चालत प्रवास केला. तेथून किरवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढे कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केल्याने एका रुग्णास बिकट परिस्थितीतही उपचार मिळाले.