अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जयप्रद देसाई यांनी जावेद अख्तर यांची मुलाखत घेतली. गीतकार म्हणून त्यांनी देशातल्या परिस्थितीविषयी त्याचप्रमाणे चित्रपटांविषयी त्यांनी मतप्रदर्शन केलं. त्यांनी औरंगजेबाविषयी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. औरंगजेबाने देशावर ५१ वर्षे राज्य केलं पण हा देश हिंदुस्थानच राहिला, असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

चित्रपटातील संभ्रमित अवस्थेबाबत काय म्हणाले जावेद अख्तर?

समाज आणि चित्रपटातील संभ्रमित अवस्थेबाबत बोलताना जावेद अख्तर म्हणाले, ‘समांतर मूल्य आणि आशाआकांक्षा या दोन्ही समोर एक वळण आले आहे. पुढचे काही न दिसणारे. जिथे चांगले वाईट काही कळत नाही. बाजारपेठ आणि उदारीकरण यातून जाताना आपण हा शब्द आता मी बनतो आहे. कारण बाजारातील भांडवलही काम करत असते. येथे आपण स्वत: काय करतो आणि समाजासाठी काय करतो आहोत हेच कळनासे झाले आहे. भांडवली बाजारपेठेचा अजेंडा काम करत असतो. पण अशा काळात लोक फायद्याचा विचार करत राहतात. पण अशा स्थितीमध्येही दु:खी होऊन चालणार नाही.

What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
Gandhi assassination Hindu Mahasabha Mangutiwar Narayan Apte Gwalior
‘गांधीहत्या’ म्हणताच काय आठवते?
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
Lakshman Shastri Joshi Manusmriti Dahan and Tarkatirtha
तर्कतीर्थ विचार: मनुस्मृती दहन व तर्कतीर्थ
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
50 Years of Deewaar Movie in Marathi
50 Years of Deewaar : दीवारची पन्नाशी! अमिताभ नव्हे ‘हा’ सुपरस्टार साकारणार होता ‘विजय’

हे पण वाचा- “Animal सारखे चित्रपट हिट होणं ही बाब चिंताजनक, कारण..”; जावेद अख्तर यांचं परखड मत

औरंगजेबाने ५१ वर्षे राज्य केलं पण

आपल्या देशावर औरंजेबाने ५१ वर्षे राज्य केले. पण हा देश हिंदुस्थानच राहिला. कारण जसे गंगा-जमुनेचे असते त्याच्या पृष्ठभागावरचे पाणी दिसते. पण एक न दिसणारा सरस्वतीचा प्रवाह आतून जात असतो. सहा हजार वर्षांची या देशाची सांस्कृतिक वीण लगेच बदलणारी नाही. तीन सभा, चार माणसांच्या वागण्याने त्यात फार फरक पडणार नाही. ती सांस्कृतिक वीण तो इतिहास हाच आपला आणि आपल्या देशाचा ‘आत्मा’ आहे. त्यामुळे संभ्रमित अवस्थेतील गोष्ट पुढे नेताना चित्रपटांमध्ये जसा नायक सापडत नाही तसेच खलनायकही सापडत नाही.

सध्याच्या नायक कसा आहे यावरही भाष्य?

देशातील चित्रपट बनविणाऱ्यांचा बुद्ध्यांक कदाचित एक अंकी असेल. पण १९६० च्या दशकातील नायक हा कोठे तरी नोकरी करणारा, मजूर, प्राध्यापक, डॉक्टर असा काम करणारा माणूस होता. आताच्या नायकाला स्वत: चे विशेषाधिकार असतात. देशातील कोणत्याही सामाजिक प्रश्नाशी त्याचे काही देणे- घेणे असत नाही. तो स्वित्झर्लंडमध्ये जगतो. शहरी  भागात वाढतो, त्याच्यासमोर कोणतेही प्रश्न नसतात. त्यामुळे तो काही कामबीम करत नाही. तो आपल्याशी नातेच सांगत नाही. कारण जसे श्रीमंतांसाठी हॉटेल आहेत, रुग्णालये आहेत. तसाच आताचा चित्रपटही श्रीमंताचा झाला आहे. खरेतर व्यावसायिक चित्रपट समाजाचे एकात्म चित्र असते. त्यामुळेच व्यावसायिक चित्रपट मोठा व्यवसाय करतात. त्यामुळे समाजातील अस्वस्थता आता चित्रपटात दिसून येत नाही. १९४०-५० च्या काळातील जमीनदार-ठाकूर आता चित्रपटांमध्ये दिसत नाहीत असंही जावेद अख्तर यांनी म्हटलंं आहे.

Story img Loader