मराठा समाजाला सरसकट ‘कुणबी’ दाखले देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे उपोषण बुधवारी सोळाव्या दिवशीही सुरू होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उपोषणस्थळी येणार असल्याचे वृत्त होते. परंतु, ते उपोषणस्थळी गेले नसल्याने मराठा आंदोलक नाराज असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, उद्या सकाळी साडेअकरा वाजता निर्णय जाहीर करणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यांनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

“सरकारने एक महिन्याची मुदत मागितली ती आम्ही दिली. मी आता आमरण उपोषण आणि नंतर साखळी उपोषण करणार आहे. आम्ही सरकारला वेठीस धरले नाही. सरकारने वेठीस धरले. ते आले आणि नाही आले तरी आम्ही नाराज होणार नाही”, असं जरांगे पाटील म्हणाले.

News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab sent mangala movie trailer to Bollywood celebrity on instagram
शिवाली परबने शाहरुख खानपासून ते जॅकी जॅनपर्यंतच्या कलाकारांना पाठवला ‘मंगला’ चित्रपटाचा ट्रेलर; सयाजी शिंदेंचं आलं प्रत्युत्तर, म्हणाले…
Eknath Shinde Shivsena Demand
Shivsena : “बाळासाहेबांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवा”, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

हेही वाचा >> Video: “बोलून मोकळं व्हायचं” असं का म्हणाले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं तेव्हा नेमकं काय घडलं!

ते पुढे म्हणाले की, “उद्या सकाळी साडेअकरा वाजता जाहीरपणाने पत्रकार परिषद घेणार. गावकऱ्यांना जमवतो आणि परत एकदा विचारतो आणि तुम्हाला सकाळी साडेअकरा वाजता निर्णय देतो.” “महिनाभर आम्ही प्रश्नाचं उत्तर विचारणार नाही. पण, एक महिना झाल्यावर विचारणार. तुम्ही आमच्याकडून वेळ घेतला होता, तर आता टिकणारं आरक्षण द्या”, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

दरम्यान, रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन रात्री उशिरा उपोषण स्थळी पोहोचले आहेत. या नेत्यांसोबत चर्चा झाल्यावर काय तोडगा निघतोय का हे पाहावं लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर जाणार होते. परंतु, काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द करण्यात आला.

व्हायरल व्हिडीओमुळे गाजला आजचा दिवस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वीचा असल्याचं व्हिडीओवरून दिसत आहे. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी या तिघांमध्ये झालेल्या संभाषणावरून विरोधकांनी परखड शब्दांत टीका करायला सुरुवात केल्यानंतर स्वत: मुख्यमंत्र्यांनी माध्यमांसमोर येत यासंदर्भात खुलासा केला आहे. तेव्हा नेमकं काय घडलं होतं, याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

काय आहे या व्हिडिओमध्ये?

मराठा आरक्षण व मनोज जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. ही पत्रकार परिषद सुरू होण्याच्या काही मिनीट आधीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा >> शिंदे, फडणवीस, पवार यांच्या व्हायरल व्हिडिओत काय दडले आहे? भाजपा सरकारला मराठा, ओबीसी, धनगर समाजाला आरक्षण द्यायचेच नाही

पत्रकार परिषदेच्या ठिकाणी येताना मुख्यमंत्री “आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं आणि निघायचं”, असं म्हणताना दिसत आहेत. त्यापुढे अजित पवार “येस, येस” असंही म्हणत आहेत. त्याच्याबरोबर असणारे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना माईक चालू असल्याची जाणीव करून दिल्यानंतर अजित पवारांनीही त्यातून आवाज जात असल्याचं सांगितलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी सरकार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गंभीर नसल्याची टीका केली.

Story img Loader