अलिबाग: मुंबई गोवा महामार्गावर सलग तीन दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेतले जाणार आहेत. कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतला जाणार आहे. वाहतुक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतुक अधिकसुचना जारी केली आहे.

११ जुलै ते १३ जुलै या तीन दिवसात हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक बंद ठेवली जाणार आहे. प्रवाश्यांनी तसेच वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.

motorist, police dragged, barricade, police,
मोटार तपासण्यासाठी थांबविण्यास सांगितल्याने पोलिसाला बॅरिकेटसह २० फुटापर्यंत फरफटत नेले; वाचा कुठे घडली ही घटना
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
police conduct mock drill ahead of pm modi pune tour for Maharashtra Assembly Election 2024
बंदोबस्ताची रंगीत तालीम; मध्यभागात वाहतूक कोंडी
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल

हेही वाचा : सांगली: सेल्फीच्या प्रयत्नात कृष्णा नदीत बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह ४८ तासांनी हाती

गेल्या १२ वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. रंदीकरण पूर्ण झाले असले तरी कासू ते इंदापूर टप्प्यातील पूलांची कामे रखडली आहेत. ही कामे आता मार्गी लावली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून कोलाड जवळील पूई येथील नवीन पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या पूलाचे गर्डर टाकण्याचे काम ११ ते १३ जूलै दरम्यान केले जाणार आहे. यासाठी सहा मोठे गर्डर आणण्यात आणण्यात आले आहेत. गर्डर बसविण्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीही पूलाजवळ दाखल झाल्या आहेत. हे काम करतांना वाहतुक बंद ठेवणे गरजेचे असल्याने ठेकेदार तथा महामार्ग विभागामार्फत वाहतुक महासंचालकांकडे वाहतूक बंद ठेवणेबाबत विनंती करण्यात आली होती. त्यानुसार वाहतुक विभाग अप्पर पोलीस माहसंचालक कार्यालयातील पोलीस अधिक्षक अरविंद साळवे याबाबतची वाहतूक प्रतिबंधात्मक अधिसूचना मंगळवारी उशीरा जारी केली आहे.

हेही वाचा : सांगली: पावसाचा जोर मंदावला, चांदोली धरण निम्म्यावर

पर्यायी मार्ग कोणते…

· वाकण पाली येथून वाहतूक भिसेखिंड, रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल.

· वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.

· या शिवाय खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.