राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर गंभीर आरोप केला. त्या असं म्हणाल्या की भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन ते तीन वेळा फोडण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. ज्यानंतर भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुप्रिया सुळेंना थेट प्रत्युत्तर दिलं. आम्ही कुणाचाही पक्ष फोडलेला नाही. फोडाफोडीचे संस्कार कुणाचे आहेत ते देशाला आणि महाराष्ट्राला माहित आहे असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंचा शरद पवारांकडे अंगुलीनिर्देश

“आम्ही कुणाचाही पक्ष फोडण्याचं काम केलेलं नाही. ते आमचे संस्कार नाहीत. असे फोडाफोडीचे संस्कार कुणाचे आहेत? हे देशाला आणि राज्याला माहित आहे. त्यांना त्यांचे संस्कार लखलाभ. इतरांचे पक्ष फोडण्याचं राजकारण ज्यांनी आयुष्यभर केलं, आता तेच लोक आमच्यावर बोलत आहेत. सुप्रिया सुळे या आमच्या ताई आहेत, आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. मात्र स्वातंत्र्यानंतरचा इतिहास जरा पाहा, कुणी पक्ष फोडून सत्ता मिळवली ते समजेल.” असं सडेतोड प्रत्युत्तर बावनकुळेंनी दिलं आहे.

Supriya sule and pankaja Munde
Supriya Sule : “बीडची बदनामी केली जातेय”, पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, “कोणताही जिल्हा…”
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या मालकाकडून धक्कादायक खुलासे
Image Of Supriya Sule.
Supriya Sule : “सर्व आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत?” संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुप्रिया सुळेंचा सवाल
sanjay raut
Sanjay Raut : “संतोष देशमुखप्रकरणी सुरेश धस पुरेसे, फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय…”, संजय राऊतांचं वक्तव्य चर्चेत!
beed sarpanch santosh Deshmukh murder
संतोष देशमुख हत्या प्रकरण: पसार आरोपी ‘वाँटेड’ घोषित
Devendra Fadnavis vs Sanjay Raut
Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस यांनी अनेकांच्या रक्ताचे डाग धुवून, त्यांना..”; बीड प्रकरणावरुन संजय राऊत यांचा आरोप काय?
CM Devendra Fadnavis big reaction on Santosh deshmukh murder
CM Devendra Fadnavis: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान; म्हणाले, “गुंडांचे राज्य…”

एकनाथ शिंदेंबाबत काय म्हणाले बावनकुळे?

एकनाथ शिंदे मर्द मराठा नेते आहेत. त्यांनी हिंदुत्वाची साथ धरली आहे. तर अजित पवार यांनी देशाच्या कल्याणासाठी मोदींना साथ दिली आहे. शरद पवारांचं घर फुटलं कारण ते घर सांभाळू शकले नाहीत. आता सुप्रिया सुळे आमच्यावर आरोप करत आहेत. मात्र मला हा विश्वास आहे की आगामी काळात शरद पवार यांचं मन परिवर्तन होईल आणि ते मोदींना पाठिंबा देतील असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं आहे.

सुप्रिया सुळेंनी काय आरोप केला होता?

“राष्ट्र्वादी पक्ष फोडण्याचा भाजपचा हा पहिलाच प्रयत्न नाही. तर याआधीही त्यांनी तीन वेळा पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला. आधीच्या दोन वेळेला त्यांना यश आलं नाही. पण तिसऱ्यावेळी त्यांना यश आलं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं. तसंच भाजपाचे १०५ आमदार कष्टाने निवडून आले त्यांच्याबाबत मला वाईट वाटतं” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. या सगळ्या आरोपांना बावनकुळेंनी उत्तर दिलं असून फोडाफोडीचं राजकारण कुणी केलं? हे सांगत असताना नाव न घेता शरद पवारांकडेच बोट केलं आहे.

Story img Loader