वाई: सर्व समाजाचे प्रतिनिधी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी सामाजिक सलोखा वाढविण्यासाठी गणेश मंडळांना भेटी देण्याचा उपक्रम राबवावा, सणांचे पावित्र्य व चांगल्या गोष्टी पुढील पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे उत्सव काळात सर्वांनी शांतता व सलोखा राखत पोलीस प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सांगितले.

गणेशोत्सव व ईदच्या निमित्ताने समाजात सुव्यवस्था राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सर्व मंडळाचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक वाई येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपविभागीय अधिकारी बाळकृष्ण बालचिम, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे आदी पोलीस अधिकारी,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nimbalkar brothers wealth investigation by income tax department
सातारा : निंबाळकर बंधूंच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, दिवसभर चौकशी सुरू; फलटणमधील निवासस्थानाबाहेर गर्दी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
kalyan rape case update Three people detained police action
कल्याण पूर्वेत पीडित कुटुंबीयांच्या घरासमोर दहशत निर्माण करणारे तीन जण ताब्यात
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा
Sanjay raut on all part mps meeting
खासदारांच्या बैठकीला मुहूर्तच मिळेना; नवीन खासदारांची एकही बैठक नाही
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..

आणखी वाचा-“ओबीसींच्या आरक्षणात आम्ही वाटेकरी…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत

बांगर पुढे म्हणाले,जे नागरिक युवक महिला जे जे समाज माध्यमाचा वापर करतात त्यांनी जबाबदारीने समाज माध्यमाचा वापर करावा. सकारात्मक विचाराने सर्वांनी जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा.साताऱ्याची शांतता समितीच्या बैठकांची सुरुवात आज वाईतून करीत आहोत. चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमाचा वापरु नये. विशेष करून युवकांनी भावनिक होऊन कोणतीच पोस्ट करू नये. यावेळी ॲडमिनने ग्रुपमध्ये लक्ष ठेवावे व कोणाची भावना दुखावणार नाही याची दक्षता घ्यावी. कळत नकळत अशा गोष्टींमुळे आपण आरोपीच्या चौकटीमध्ये येतो. चांगले उपक्रम राबवून मंडळानी एक आदर्श निर्माण करावा व पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना भेटी देण्यास सांगावे. पोलीस प्रशासन हे राज्यांमध्ये नावलौकिक प्राप्त करत आहे. वाई व भुईंजमधील झालेल्या चोऱ्या करणारे संशयित पकडले असून मुद्देमाल हस्तगत करण्याचे काम सुरु आहे. राज्यात सातारा पोलीस क्राईम रेट ,गुन्हे प्रकटीकरण, शस्त्र शोध व जप्ती, गुन्हेगारांना पकडण्यात व शिक्षा करण्यात अव्वल स्थानावर आहे.

आणखी वाचा-“फडणवीसांनी राणांना आवर घालण्याची गरज आहे”, बच्चू कडूंच्या वक्तव्यावर रवी राणा प्रत्युत्तर देत म्हणाले…

यावेळी आरपीआयचे अशोक गायकवाड, माजी नगराध्यक्ष अनिल सावंत, काशिनाथ शेलार, विक्रम वाघ,सलीम बागवान, स्वप्नील गायकवाड, सचिन फरांदे, भारत खामकर, दिलीप हगीर,मोज्जम इनामदार, महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्यांनी मत व्यक केले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक कृष्णकांत पवार,बिपीन चव्हाण,सुधीर वाळुंज ,पोलीस अंमलदार,कर्मचारी,नागरिक उपस्थित होते.

Story img Loader