सांगली : भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी समर्थकासह कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्षांच्या घरात घुसून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. मात्र, मारहाण झाल्याची कबुली देत आपल्या स्वीय सहायकाला तिघांनी काल रात्री मारहाण केल्याचा दावाही माजी खासदार पाटील यांनी केला. या घटनेप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी केलेल्या तक्रारीनुसार माजी खासदार  पाटील यांनी आपल्या समर्थकासह घरात घुसून मारहाण केली. तसेच घरातील महिला व मुलांनाही मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. मारहाणीपासून वाचविण्यासाठी पुढे आलेल्या ७६ वर्षाच्या आईलाही माजी खासदारांनी ढकलून दिले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही घटना आज सकाळी साडेसात वाजता घडली.

bjp leader vinod tawde reply to sharad pawar for targeting amit shah
अमित शहा देशभक्तीच्या प्रकरणात तडीपार; विनोद तावडे यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
shetkari kamgar paksh break in alibaug
मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; अलिबागमधील ‘शेकाप’च्या पाटील कुटुंबात फूट
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
Ashish Shelar Criticise Sharad Pawar
Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका
minister ashish shelar criticized sharad pawar over conflict in mva
शरद पवारांच्या राजकीय ऱ्हासाला सुरुवात : आशिष शेलार

हेही वाचा >>> Nitin Gadkari PM Offer : गांधी, पवार की ठाकरे, कोणत्या विरोधकांकडून होती पंतप्रधान पदाची ऑफर; नितीन गडकरी म्हणाले…

दरम्यान, या घटनेबाबत  माजी खासदार पाटील यांनी सांगितले, शुक्रवारी रात्री स्वीय सहायक खंडू होवाळे यांना मुल्ला, बाळासाहेब पाटील व पिंटू कोळेकर या तिघांनी मारहाण केली होती. ही माहिती मिळताच आज विचारणा करण्यासाठी मी मुल्ला यांच्या घरी गेलो होतो. मात्र, त्यांची भाषा अर्वाच्च व ताणून मारण्याची होती. यामुळे संतप्त झालेल्या एका कार्यकर्त्याने दोन थोबाडीत लगावल्या. होवाळे याला झालेल्या मारहाण प्रकरणी पोलीस ठाण्यात  रितसर तक्रार  दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Video: लाडक्या बहिणीने कार्यालयाची नासधूस केली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणीतरी जाणीवपूर्वक…”

दरम्यान, मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माजी खासदार पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी  काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला असून आमदार सुमनताई पाटील, रोहित पाटील यांच्यासह जमाव पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून बसला होते. 

या प्रकारावरून कवठेमहांकाळमध्ये तणाव निर्माण झाला असून पोलीस बंबोबस्त  वाढविण्यात आला आहे.आमदार सुमनताई पाटील व  रोहित पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात जमले आहेत. गुंडगिरी विरूध्द शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आजच्या घटनेप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

Story img Loader