शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालं आहे. औरंगाबादच्या खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घएतला. या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या १०२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केशवराव धोंडगे हे दीर्घकाळ विधीमंडळाचे सदस्य राहिले. त्यांनी आमदार आणि खासदार म्हणून लोकांचं प्रतिनिधित्व केलं. विधानसभेतली त्यांची भाषणं खूप गाजली. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते अशी त्यांची ख्याती होती.

केशवराव धोंडगे पाचवेळा आमदार राहिले

Two hundred patients of hair loss problem ICMR team in Shegaon
केसगळतीचे रुग्ण दोनशेच्या घरात; ‘आयसिएमआर’चे पथक शेगावात…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Former Shekap district secretary and Meenakshi Patil son Aswad Patil will join BJP print politics news
शेकापचे पाटील कुटुंबीय भाजपच्या वाटेवर
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
MahaRERA action against 905 housing projects Mumbai news
१,९०५ गृहप्रकल्पांवर ‘महारेरा’ची कारवाई; नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या विकासकांची बॅँक खाती गोठवली
loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’
Crime against developer who stalled Zhopu scheme Mumbai news
झोपु योजना रखडवणाऱ्या विकासकाविरुद्ध गुन्हा; प्रलंबित योजनांचा आढावा घेऊन कठोर कारवाई करणार

केशवराव धोंडगे हे पाचवेळा आमदार झाले होते तर एकदा खासदार झाले होते. मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडत असल्याने त्यांना मराठवाड्याची मुलुख मैदान तोफ असंही म्हटलं जात होतं. कंधार तालु्क्यातल्या गऊळ या गावात त्यांचा जन्म झाला होता. समस्या सहन करणाऱ्या, पिचलेल्या समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी केशवराव धोंडगे आग्रही होते. त्यांनी अनेक आंदोलनांमध्येही सहभाग घेतला होता. त्यांनी या समाजातल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकदा प्रश्न उपस्थित केले.

खासदारपदी एकदा आणि पाचवेळा आमदारपद भुषवलेल्या केशवराव धोंडगे यांनी आपल्या कामाचा ठसा कायमच आपल्या आंदोलनातून आणि आपल्या भाषणांमधून तसं आपल्या कार्यातून उमटवला. निर्भिड आणि स्वाभिमानी बाणा हे त्यांचे स्वभावविशेष होते. विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी ते सभागृहात उपस्थित राहात असत.

ऑगस्ट महिन्यात करण्यात आला होता गौरव
राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात केशवराव धोंडगे यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या शताब्दीच्या वेळीच सरकार त्यांचा सत्कार करणार होतं. पण करोनामुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

केशवराव धोंडगे यांनी शरद पवारांना दिली होती खास उपमा
केशवराव धोंडगे यांनी शरद पवार यांना बिनचिपळीचा नारद अशी उपमा दिली होती. एवढंच नाही तर वयाची शंभरी पार केल्यावरही ते म्हणायचे की मी शंभरीत असलो तरीही मी शेवटपर्यंत काम करत राहिन. तत्त्वाचे राजकारण करणारे मोजकेच आहेत पण रंग बदलणारे खूप. सरड्यासारखे रंग बदलणारे खूप असतात असं मत केशवराव धोंडगे यांनी त्यांच्या शंभरीच्या वेळी मत व्यक्त केलं होतं.

औरंगाबादला आकाशवाणी केंद्र व्हावे, उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, परभणीत कृषी विद्यापीठ व्हावे अशा अनेक मागण्या केशवराव धोंडगे यांनी लावून धरल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलण्याची संधी मिळाल्यावर त्यांनी विरोधकांना घाम फोडला होता. पण त्यांचे बोलणे मोठे विनोद निर्माण करणारे होते. महाराष्ट्राच्या भेटीला आलेल्या इंग्लंडच्या राणीला वस्त्रालंकार आणि नथ भेट देण्यात आली होती. त्यावरून धोंडगे यांनी केलेल्या टिप्पणीमुळे सभागृहात हशा पिकला होता.

Story img Loader