क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर केलेल्या मारहाणीत एका माजी सैनिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबादमधील सातारा येथे सदानंद नगर परिसरात रविवारी (दि.२) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी शेजाऱ्यांविरोधात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, बबन कुंडलिक मगरे (वय ४५, रा. सदानंद नगर, सातारा परिसर) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. बबन मगरे हे लष्करातून सेवानिवृत्त झाल्यावर सेंट्रल बॅक ऑफ इंडियामध्ये सुरक्षारक्षक (गनमॅन) म्हणून नोकरी करीत होते. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारासत मगरे व त्यांच्या पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद सुरू होता. त्यावेळी त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या एका व्यक्तीने मगरे यांना तुम्ही नेहमी तुमच्या पत्नीला का भांडता, तुमच्या भांडणामुळे आम्हाला त्रास होतो, भांडण करायचे असेल तर दुसरीकडे जावून करा, आमच्या घरासमोर भांडणे करू नका, असे सांगत शिवीगाळ केली. यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला. त्यानंतर शेजाऱ्याने पाच ते सहा साथीदारांच्या मदतीने बबन मगरे यांना लाठ्या-काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने बबन मगरे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू

गंभीर झालेल्या मगरे यांना त्यांचे नातेवाईक असलेल्या सौरभ मगरे यांनी उपचारासाठी छावणीतील लष्करी रूग्णालयात दाखल केले. तेथे प्रकृती खालावल्यामुळे मगरे यांना लष्करी रूग्णालयातून खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तेथे प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचारांदरम्यान सोमवारी (दि.३) सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader