जागतिक वारसास्थळ असणाऱ्या कास पठार परिसर हा अति संवेदनशील म्हणून ओळखला जातो . त्यामुळे या परिसरात सतत शांतता असते .या परिसरात मोठ्यांचा आवाज करणे सततच्या वाहतुकीला बंदी आहे. मात्र, या पठारावर केंद्रशासनाच्या नियमातील पळवाटा शोधत लग्न समारंभात नववधूसाठी हेलिकॉप्टर उतरविण्यात आले. याबाबत साताऱ्याचे प्रशासन अनभिज्ञ राहिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
हेही वाचा- सांगली : हातपाय बांधून, शस्त्राचा धाक दाखवत लुटले; सात लाखांचा ऐवज लंपास
कास पठार हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात जैवसंपदा आहे. अनेक छोटे-छोटे जीवजंतू या ठिकाणी जंगलात वास्तव्य करून आहेत. त्यामुळे हा परिसर संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरात अनेक संशोधक सतत संशोधन करत असतात. मांत्र केंद्रशासनाच्या हेलिकॉप्टर उतरवण्याच्या नवीन कायद्यातील पळवाट शोधत हेलिकॉप्टर चालक एजन्सीने कास पठारावरच हेलिकॉप्टर उतरविण्याचे नोंद शासनाकडे केली. यासाठी त्यांना परवानगीही मिळाली. साताऱ्यातील एका नववधूच्या पाठवणीसाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. याबाबत सातारा प्रशासनाकडे कोणतीही नोंद नसल्याचे समजते. केंद्र शासनाच्या नवीन हेलिकॉप्टर उतरविण्याच्या कायद्यात कास पठाराला परवानगी दिल्याने अशा प्रकाराला यापुढे परवानगी देण्यास पर्यावरण प्रेमींनी विरोध दर्शविला आहे.
हेही वाचा- “लाज नसलेल्या माणसाला…”, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना आव्हाडांचा टोला
गोंधळ आणि आवाज आदी कारणाने नुकताच आयोजित कास महोत्सव देखील वादाच्या भोवऱ्यात आला होता. ज्या ठिकाणी कास महोत्सव भरला त्याच जागेवर हेलीपॅड तयार करून हेलिकॉप्टर उतरल्याची माहिती समोर येत आहे. हेलिकॉप्टर परवानगी नेमकी दिली कोणी असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी,प्रशासनास कोणतीही माहिती नसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा- “एकनाथ शिंदेंचा NIT भूखंड घोटाळा बाहेर काढण्यात भाजपाचा हात?” अजित पवारांचं मोठं विधान!
कास पठार परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये लग्नात नवरा नवरीसाठी हेलिकॉप्टर आल्याची माहिती समोर येत आहे.या बेकायदेशीर हेलिकॉप्टर प्रकरणावर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे . आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टू रुचिरा लावंड तिचा विवाह कास येथील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आला होता. यासाठी नववधू हेलिकॉप्टरमध्ये बसून कास पठारावरन सासरी गेली . यासाठी हेलिकॉप्टर कास पठार उतरले होते. याबाबत सातारा प्रशासनाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र केंद्र शासनाच्या नवीन नियमावलीनुसार हेलिकॉप्टर चालक कंपन्या शासनाच्या नियमाच्या प्रमाणे परवानगी घेऊन कुठेही हेलिकॉप्टर उतरवू शकतात. त्या कंपनीकडे संपर्क साधून आम्ही असे हेलिकॉप्टर उतरवले होते व त्यांनीच अशी परवानगी घेतली अशी माहिती नववधू रुचिरा लावंड हिचा भाऊ अवस्थी लावंड याने दिली.