आजवर समाजाची सर्वागीण प्रगती की अधोगती झालीय हे पडताळण्यासाठी राज्याच्या व देशाच्या एकंदरच अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा लागेल असे सांगताना, देशातील एकाही शास्त्रज्ञ, अभियंता वा विद्वानाला नोबेल पारितोषिक का मिळत नाही, केंद्र शासनामध्ये महाराष्ट्रातील एकही सचिव नाही. कोणी सैन्यदलाच्या सर्वोच्च पदावर पोहोचले नसल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली. भारताला महासत्ता व्हायचे असेल तर इथल्या विद्यार्थ्यांचे मायबोलीबरोबरच इंग्रजी व गणितावर प्रभुत्व असणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कराड आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘सर विश्वेश्वरैया पुरस्कार’ जुन्या पिढीतील तज्ज्ञ स्थापत्य अभियंता पांडुरंग कृष्णाजी नलवडे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम हे होते. तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील, नगराध्यक्ष प्रा. उमा हिंगमिरे, आनंदराव पाटील यांची उपस्थिती होती. सत्कार समारंभापूर्वी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडी) ‘मुंबई मेट्रो लाईन थ्री’ या २५ हजार कोटी खर्चाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची चित्रफीत देशात प्रथमच दाखवण्यात आली.
सत्कारमूर्ती पांडुरंग कृष्णाजी नलवडे तथा काका हे आपले प्रदीर्घ आयुष्य तळमळीचे उत्कृष्ट अभियंता म्हणून जगले. वयाच्या ८०व्या वर्षीही ते अभियंत्यांसाठी सक्रिय व मार्गदर्शक असल्याबद्दल समाधान व्यक्त करून चव्हाण म्हणाले, की लोकांचे महानगराकडे आकर्षण असल्याने वाढते नागरीकरण व द्यावयाच्या पायाभूत सेवासुविधा हे मोठे आव्हान आहे. वाढत्या नागरीकरणातच मुंबई विकसनशील व झोपडपट्टीमुक्त करायची आहे. मात्र, कोण खासगी विकसक स्वीकारायचा, विकसकांची भांडणे, बांधकामातील गैरप्रकारांमुळे मुंबईची पुरती वाट लागत असताना, आघाडीच्या सरकारमुळे खंबीरपणे निर्णय घेता येत नसल्याची खंत त्यांनी व्यकत केली. तरीही मोठय़ा धाडसाने निर्णय घेत आहोत. मात्र, झोपडपट्टीमुक्त मुंबई आणि सर्वच समाजघटकांना निवारा देण्यासाठी बांधकामांना काय सवलती द्यायच्या असा प्रश्न सतावतो आहे. १६० चौरस फुटांच्या खुराडय़ासारखी राहण्याची गृहयोजना मला मान्य नाही. वाहतुकीचा प्रश्न पाहता जे लोक ज्या ठिकाणी काम करतात, तेथेच त्यांच्यासाठी घरे व्हावीत, सर्वच शहरांचा उत्तम विकास आराखडा व्हावा अशी भूमिका असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईत मोठय़ा प्रमाणात प्रकल्प उभारण्यात येत असून, राज्य शासन १० हजार कोटींचे प्रकल्प हाती घेत आहे. असे असताना, मात्र शिवडी ते न्हावाशिवा या सागरी उड्डाणपुलासाठी कोणाचेही टेंडर आले नसल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्यात नाईट लँडिंगसह सक्षम विमानतळ केल्याखेरीज मोठे उद्योग तेथे येणार नाहीत. म्हणूनच प्रत्येक जिल्ह्यात अशी विमानतळे उभारली जाणार असून, उद्योग क्षेत्र विस्तारायचे असेल तर पायाभूत सुविधा हव्यातच असे त्यांनी सांगितले. इंजिनिअरिंग प्रवेशाच्या ४० टक्के जागा रिक्त राहात, तर इंग्रजीसाठी दर्जेदार शिक्षक मिळत नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
पांडुरंग नलवडे म्हणाले, की हा पुरस्कार स्वातंत्र्यपूर्वकाळातील इंजिनिअरलाच असावा. कारण, त्या वेळी बीई सिव्हिल ही पदवी घेण्यासाठी बुद्धिमत्ता गरजेची राहताना, मोठे कष्ट उपसावे लागले आहेत. शिष्यवृत्ती न मिळाल्याने मला तर अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. पुण्यात हाताने स्वयंपाक करायचा आणि कॉलेजकडे पायी चालत जावे लागत असे. माझ्या शिक्षणाच्या ध्येयासाठी आईला अपार कष्ट घ्यावे लागले. मात्र, त्या वेळी १० कोटी रुपये खर्चाच्या कोयना धरण प्रकल्पाच्या उभारणीत, तसेच तेथील विविध शाखांमध्ये आत्मविश्वासाने, अनेक नव्या पद्धती स्वत: निर्माण करून त्या अंगाने लक्षवेधी काम करण्याची मिळालेली संधी निश्चितच समाधानाची असल्याचे ते म्हणाले.
डॉ. पतंगराव कदम म्हणाले, की पी. के. नलवडे कराड तालुक्यातील पहिले बीई सिव्हिल इंजिनिअर असल्याने ते सर्वात सीनिअर असून त्यांचा सत्कार मोलाचा आहे. भारती विद्यापीठातून चमकणारे विद्यार्थी हीच माझी येथून पुढची ताकद आहे. पी. के. नलवडे अगदी खेडय़ातील शेतकऱ्याचा मुलगा त्या काळी ‘बीई’ला प्रवेश मिळवतो आणि कमालीच्या बिकट परिस्थितीत उच्चशिक्षण घेतो. महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी कोयना प्रकल्प साकारण्यात नलवडे यांचे मोलाचे योगदान राहते. हे अभिमानाचे असून, नलवडे यांना दीर्घायुष्य लाभो.
प्रास्ताविकात असोसिएशनचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा सादर करताना आपल्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.
 

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…
Story img Loader