2024 Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Updates : यंदाची विधानसभा निवडणूक मराठा आंदोलनाभोवती केंद्रित राहिली. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम महायुतीला लोकसभा निवडणुकीत दिसला. मराठा फॅक्टरमुळे लोकसभेला मोठा फटकाही बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही हीच जादू दिसेल का असा प्रश्न होता. मतदानानंतर आलेल्या एक्झिट पलनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. कारण, १० पैकी ६ एक्झिट पोल्सनुसार महायुती जिंकून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मराठा फॅक्टर या निवडणुकीत कितीसा प्रभावी ठरला याबाबत साशंकता आहे.

इलेक्ट्रोल एज एक्झिट पोल काय सांगतो?

महायुती -११८ जागा
महाविकास आघाडी १५० जागा

Maharashtra Voting Percentage| Maharashtra District Wise Voting Percentage in Marathi
राज्यात ६५.११ टक्के मतदान, ३० वर्षांमधील सर्वाधिक प्रतिसाद, ‘हा’ जिल्हा सर्वात जागरुक, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात निरुत्साह
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Adani Group Chairman Gautam Adani Fraud Bribery Case News in Marathi
Gautam Adani Fraud: गौतम अदाणी, पुतण्या सागर अदाणी यांनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत दोषारोप
Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

पोल डायरी एक्झिट पोल

महायुती -१२२ ते १८६
महाविकास आघाडी- ६९ ते १२१

चाणक्य एक्झिट पोल

महायुती १५२ ते १६० जागा
महाविकास आघाडी -१३० ते १३८ जागा

मॅट्रिझचा एक्झिट पोल

महायुती १५० ते १७० जागा
महाविकास आघाडी – ११० ते १३० जागा

पी मार्क्यू एक्झिट पोल

महायुती-१३७ ते १५७ जागा
महाविकास आघाडी- १२६ ते १४६ जागा

रिपब्लिक एक्झिट पोल

महायुती- १३७ ते १५७ जागा
महाविकास आघाडी १२६ ते १४६ जागा

SAS एक्झिट पोल

महायुती – १२७ ते १३५ जागा
महाविकास आघाडी- १४७ ते १५५ जागा

पिपल्स पल्स एक्झिट पोल

महायुती १७५ ते १९५ जागा
महाविकास आघाडी-८५ ते ११२ जागा
इतर- ७ ते १२ जागा

भास्कर रिपोर्टर्स पोल

महायुती- १२५ ते १४० जागा
महाविकास आघाडी १३५ ते १५० जागा

लोकशाही महारुद्र

महायुती-१२८ ते १४२ जागा
महाविकास आघाडी- १२५ ते १४० जागा
इतर – १८ ते २३ जागा

दहापैकी सहा एक्झिट पोल्स महायुतीच्या बाजूने

असे हे दहा एक्झिट पोल (Maharashtra Assembly Elections Exit Poll 2024) आहेत. यापैकी सहा पोल्सनी महायुतीचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे. तर लोकशाही महारुद्रच्या पोलने राज्यात त्रिशंकू अवस्था असेल आणि अपक्ष किंवा बंडखोरांच्या हाती सत्तेच्या चाव्या असतील असा अंदाज वर्तवला आहे. प्रत्यक्षात काय होणार हे २३ तारखेला स्पष्ट होणार आहे.

मराठा मतदारांचं काय?

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. मागच्या वर्षी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी उपोषण करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर जरांगे पाटील चर्चेत आले होते. विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनंतर काही उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र, आदल्या रात्री जरांगे पाटील यांनी सांगितल्यानंतर अर्ज मागे घेण्यात आले. आम्ही कोणत्याही उमेदवारांना पाठिंबा देणार नाही, असंही ते म्हणाले होते. परंतु, मराठा आरक्षणाचा विचार करून मतदान करा, असं आवाहन त्यांनी मराठा मतदारांना केलं होतं. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत मराठा मतदार मोठा प्रभाव पाडण्याची शक्यता होती. परंतु, एक्झिट पोल्सनुसार मराठा मतदारांचा फारसा प्रभाव पडलेला नसल्याचं दिसतंय. मात्र, हे चित्र २३ नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.