चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे उदगीर-लातूर या एसटी बसमध्ये शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या स्फोटात ३२ प्रवासी जखमी झाले. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, धावत्या बसमध्ये एकाएकी झालेल्या या स्फोटामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली व भीतीचे वातावरण पसरले. याबाबत उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. उदगीरहून लातूरकडे ही बस निघाली होती.

Story img Loader